Shambhuraj Desai, Supriya Sule sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Supriya Sule News : खोके सरकारच्या काळात दारूची दुकाने वाढली : सुप्रिया सुळेंचा टोला

NCP Satara राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज सुप्रिया सुळेंचे शासकीय विश्रामगृहात आगमन झाले.

Umesh Bambare-Patil

Satara Supriya Sule News : राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय खोके सरकारचा दिवस सुरू होत नाही. या खोके सरकारच्या काळात शाळा कमी होऊन दारूची दुकाने वाढली आहेत, असा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना लगावला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवडे (ता. कोरेगाव) येथे आयोजित कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांचे आज सातारा शासकिय विश्रामगृहात सायंकाळी आगमन झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव उपस्थित होत्या.

या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या राज्यापुढे अनेक आव्हाने असून हे सरकार आईस (इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडी) मध्ये व्यस्त आहेत.

अतिशय असंवेदनशील हे खोके सरकार असून, राष्ट्रवादीवर बोलल्या शिवाय खोके सरकारचा दिवस सुरू होत नाही आणि मावळत पण नाही. या खोके सरकारच्या काळात शाळा कमी होत असून, दारूची दुकाने वाढत आहेत, असा टोला त्यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लगावला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT