Udayanraje Bhosale, Shambhuraj desai
Udayanraje Bhosale, Shambhuraj desaisarkarnama

Satara News : शंभूराज देसाई सातारकरांना दिलेल्या शब्दावर राहिले पक्के; उदयनराजेंचाही सहभाग

Shambhuraj Desai शाही दसरा उत्सवासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
Published on

Satara Udayanraje Bhosale news : कोल्हापूर येथील दसरा उत्सवाच्या धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शाही दसरा सोहळ्यात शासनाचे सर्व विभाग सहभागी होणार आहेत. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गेल्यावर्षी सातारकरांना शब्द दिला हाोता.

शाही दसरा उत्सवासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादवे घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, भाजपचे नेते सुनिल काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

शाही दसरा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपआपले योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना श्री. देसाई यांनी केली. गेल्यावर्षी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्यावतीने साताऱ्यात दसरा महोत्सव साजरा केला जाईल, असा शब्द सातारकरांना दिला होता. तो त्यांनी खरा केला आहे.

ते म्हणाले, जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पुजनावेळी पोलिस बॅण्ड पथकाने मानवंदाना दिली जाणार आहे. मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांना पोशाख  दिला जाणार आहे. पालखी सोबत समारंभाच्या पोषाखातील पोलिस पथक ठेवावे. Maharashtra political news

Udayanraje Bhosale, Shambhuraj desai
बघा साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात काय घडलं ? | Bacchu Kadu In satara

शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रित दिले जाणार आहे. दसरा सणा दिवशी शाही मिरवणुकीला सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथून निघेल. ती राजपथावरन पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक असलेल्या शिवतीर्थावर येईल.

Edited By : Umesh Bambare

Udayanraje Bhosale, Shambhuraj desai
Pune ACB News : पुणे 'एसीबी'ची मोठी कारवाई; एकाच दिवशी दोन ट्रॅप, तीन लाचखोर जाळ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com