mp Udayanraje Bhosale , Shivendrasinhraje sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना जोरदार प्रत्युत्तर , म्हणाले..

उदयनराजेंना कोणताही मंत्री कसा इतका वेळ देतो, मला तसा वेळ कोणीच का देत नाही, अशी सल त्यांना बोचत आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : "कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे," असा टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinhraje) यांना लगावला आहे. (Udayanraje Bhosale latest news)

खासदार उदयनराजे दिल्लीत विविध मंत्र्यांना भेटून निवेदन देत आहेत. विविध विकास कामासाठी निधी आणण्यासाठी सुरू असलेल्या गाठीभेटीवरून शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्यावर टीका केली होती. उदयराजेंची दिल्लीत नौटंकी सुरू असल्याची टीका त्यांनी होती. त्याला आज उदयनराजेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले.

खासदार उदयनराजे म्हणाले, "सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक असल्याने सार्वजनिक कामात बाप दाखवा नाहीतर श्राध्द कर अथवा एक घाव दोन तुकडे करण्याची भुमिका घेण्याचा वारसा लाभला आहे. लोकहित लक्षात घेवून आम्ही एखादा प्रश्न घेवून कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहिती दिली तर त्यात वावगं काहीच नाही,"

"ते कधी सार्वजनिक प्रश्न घेवून कोणाकडे जात नसतील आणि जरी गेले तरी त्यात स्वार्थाचा मतितार्थ अधिक असेल तसेच त्यांना कोणी मंत्री महोदय भेटीसाठी कदाचित उभं करत नसतील. या कारणामुळेच उदयनराजेंना कोणताही मंत्री कसा इतका वेळ देतो, मला तसा वेळ कोणीच का देत नाही, अशी सल त्यांना बोचत आहे. त्यामुळे त्यांनी ही गरळ ओकलेली आहे. त्याला फार महत्व देत नाही. भ्रष्टाचार आणि स्वार्थी विचाराने बरबटलेल्यांनी भ्रष्टाचाराबाबत आरोप करणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल,असा टोला उदयनराजेंनी लगावला.

उदयनराजे म्हणाले, "बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. बँकांतील घामाचा पैसा मागण्यासाठी यांच्या घरासमोर याचना करणाऱ्या व्यक्तींना, समस्त सातारकरांनी पाहिलेले आहे. काविळ झाली की सर्व जग जसे पिवळे दिसते, तसे सगळेच भ्रष्टाचार करतात असे त्यांना वाटत असावे. त्यांची किव वाटते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT