शिंदे सरकारला धक्का ; न्यायालय ठरविणार औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर?

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. कर्णिक यांनी यावर १ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.
शिंदे सरकारला धक्का ; न्यायालय ठरविणार औरंगाबाद की  छत्रपती संभाजीनगर?
sarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने आपल्या मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत प्रथम औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामांतर केले. त्यानंतरही पुन्हा दोन मंत्री असलेल्या शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar) केले आहे. आता या नामातराला आव्हान न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (Aurangabad latest news)

औरंगाबाद महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष मुश्ताक अहमद, अण्णा खंदारे आणि राजेश मोरे यांनी हे आव्हान दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. कर्णिक यांनी यावर १ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.

सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारने केलेले नामांतर रद्द करण्यात यावे. शहराचे नाव पूर्ववत औरंगाबाद कायम ठेवावे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम समजावा, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

शिंदे सरकारला धक्का ; न्यायालय ठरविणार औरंगाबाद की  छत्रपती संभाजीनगर?
Karnataka : युवा नेत्याच्या हत्येनं राजकारण तापलं ; भाजप खासदाराची कार फोडली

उद्धव ठाकरे यांचे अल्पमतातील सरकार असल्याने निर्णय टिकणार नसल्याने नव्याने दोन मंत्री असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचाउर्वरित. निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करावा, या सरकारला तो अधिकार नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत म्हटलं आहे की..

  1. घटनेत नमूद केल्याप्रमाणे किमान बारा मंत्री असल्याशिवाय घेतलेला ठराव ग्राह्य धरण्यात येणार नाही. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य आहे.

  2. राज्यशासनाने १९९५ मध्ये शहराचे नाव बदलले होते. तेव्हा यालाही आव्हान देण्यात आले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली होती.

  3. औरंगाबाद शहराच्या नामांतरापेक्षा उद्योग तसेच बेरोजगारी हे विषय महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. एकदा सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या विषयासंबंधी निर्णय दिल्यानंतर तो अंतिम समजण्यात यावा, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला.

  4. राज्य शासनाने २००१ मध्ये नामांतराची अधिसूचना रद्द केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ यूसुफ मुछाला आणि सझिर खान यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com