Udayanraje Bhosale News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशाची राजधानी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणेत यावे. तसेच महापुरुषांची बदनामी करणा-यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा. पर्यटन मंत्रालयामार्फत शिवस्वराज्य सर्किट विकसित करावे, या प्रमुख मागण्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास प्रसिध्द करावा, आदी मागण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale दिल्लीत असून जिल्ह्यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातूनच त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारावे. ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगांचे मुल्य अधिकृत ठरवण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमुन पुरातत्व विभागाच्या वतीने प्रसिध्द झालेले तसेच अप्रसिध्द राहिलेले दस्ताऐवज, चित्रे, शस्त्रागाराची माहिती एकत्रित करुन तो अधिकृत इतिहास शासनाने प्रसिध्द करावा.
तसेच ज्या विदेशात असलेले ऐतिहासिक दस्तावेज भारतात आणण्यसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. तसेच अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्ये केली गेली. त्यामधुन सामाजिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यासंदर्भात कायदेतज्ञांची मदत घेऊन अशा घटना घडु नयेत व महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्यास कडक शिक्षेची तरतुद असलेला कायदा संसदेत पारीत करावा. तसेच ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातुन अनेकवेळा इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जाते. अशा प्रकारांना आळा बसावा. अशा चित्रपटांसाठी नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्राने अधिकृत ठरविलेला इतिहासच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये प्रसिध्द होईल. ज्यामुळे इथुन पुढे असे शालेय पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापल्याने वादविवाद होणार नाहीत, अशी आग्रही मागणी श्री. शाह यांच्याकडे उदयनराजेंनी केली. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी आस्थेवायिकपणे सर्व मुद्दे समजून घेतले. यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. येत्या काही दिवसात याविषयी हालचाली सुरु होतील, असे त्यांनी सांगितले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.