MP Vikhe and Ram Shinde held a rally in the rain
MP Vikhe and Ram Shinde held a rally in the rain Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

खासदार विखे आणि राम शिंदेंनी पावसात गाजविली सभा

Amit Awari

अहमदनगर : कर्जत येथे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी एक सभाही झाली. सभेला गर्दी जमलेली असतानाच पावसाचे दमदार आगमन झाले. तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. पाऊस सुरू असूनही दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कमी झाली नाही. जिल्हाभर या सभेची चर्चा सध्या रंगली आहे. MP Vikhe and Ram Shinde held a rally in the rain

हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सायंकाळी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनानंतर सभा झाली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. खासदार सुजय विखे यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. तरीही कार्यकर्ते व समर्थक पावसात उभे राहून भाषण ऐकत असल्याचे पाहून या दोन्ही नेत्यांनी भाषणे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

खासदार सुजय विखे म्हणाले, सध्या कोरोना काळात अनेक जण अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे घराघरात मनोरंजन व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक व खासदार संजय राऊत या दोघांना नेमले आहे. ते दोघे उठसूठ बडबडतात. यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा असे खासदार विखे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

विखेच्या भाषणाच्या शेवटी पावसाचे आगमऩ झाले. यावर खासदार विखे म्हणाले की, आज पावसामध्ये माझाही नंबर लागून गेला. या सभेच्या माध्यमांतून गोदड महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे. आगामी काळात सुखद घटना घडणार आहेत. पावसाच्या सभेत नंबर लागला, असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेची आठवण विरोधकांना करून देत कोपरखळी मारली.

राम शिंदे म्हणाले, मला दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलायचे होते. पण पाऊस आला. मात्र हा पाऊस आवश्यक होता. महावितरण प्रशासनामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे पिके सुकून चालली होती. अशात आलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावह आहे. मतदार संघात जलयुक्त शिवार व रस्त्याची कामे करूनही मला 2019 निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, असे म्हणत त्यांनी आपले मनातील शल्य व्यक्त केले.

यावेळा राम शिंदे याच्या कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार राम शिंदे अशा जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सचिन पोटरे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, धांडेवाडीचे सरपंच काका धांडे, दादा सोनमाळी, पप्पू धोदाड आदींचीही भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT