Dhananjay Mahadik, Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : महाडिकांना काँग्रेसवर वेगळाच संशय; लाडक्या बहिणींना केलं सावध...

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Congress BJP Maharashtra Government Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील काही काँग्रेसचे आमदार लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांकडून फॉर्म भरून घेत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती मधील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील काही काँग्रेसचे आमदार लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांकडून फॉर्म भरून घेत आहेत.

कोल्हापुरातील या काँग्रेस आमदारांवर भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना वेगळाच संशय आहे. काँग्रेस कार्यकर्ते या योजनेसाठी जिल्ह्यातून महिलांचे फॉर्म भरून घेत आहे. मात्र हे फॉर्म भरून घेऊन शासनापर्यंत पोहोचवतीलच असे नाही. ही योजना महिलांपर्यंत काँग्रेस पोहचू देणार नाही, असा आरोप महाडिकांनी केला आहे. त्यांनी नेमके कोणत्या आमदारांवर निशाणा साधला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

योजनेचा लाभ मिळाला नाही, असा चुकीचा आरोप काँग्रेसकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महिलांनी शासकीय यंत्रणा अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र, महायुतीचे कार्यकर्ते यांच्यामार्फतच फॉर्म भरून घ्यावेत, असे आवाहन महाडिकांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आणि काँग्रेसने खोटा प्रचार केला. संविधान बदलणार म्हणून कांगावा केला. काँग्रेसने महिलांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली, याचा फटका महायुतीला बसला. पण विधानसभेला खोटा प्रचार चालणार नाही, असे महाडिक म्हणाले.

कोल्हापुरात दहा जागा वर भाजप लागण्यास तयार आहे. मात्र महायुती म्हणून आम्ही सध्या एकत्र आहोत. जागांबाबत काय निर्णय होईल, हे वरिष्ठांच्या निर्णयावरच ठरेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT