Sharad Pawar : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी शरद पवार साताऱ्यात ॲक्टिव्ह; कार्यकर्त्यांना म्हणाले...

Sharad Pawars On Satara Assembly elections : पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे इथली राष्ट्रवादीची ताकद काही प्रमाणात विभागली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. 'तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू' असं पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर म्हटलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे आता साताऱ्यात आता ते नेमका कोणता डाव टाकणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने सातारा (Satara) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे इथली राष्ट्रवादीची ताकद काही प्रमाणात विभागली आहे. त्याचा फटका नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.

Sharad Pawar
Video Prakash Ambedkar : "जरांगे-पाटलांनी 288 उमेदवार उभे करावेत, पण...", प्रकाश आंबेडकरांनी काय दिला सल्ला?

शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे येणारी विधानसभादेखील शरद पवार गटासाठी कठीण असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह भरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काहीही करुन सातारा जिंकायचा असा निर्धार पवारांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

Sharad Pawar
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

तुम्ही कसं निवडून येत नाही ते मी बघतो

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना पवार म्हणाले, "तुम्हाला एवढंच सांगतो की, तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसं निवडून येत नाही ते मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू. काही दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा की आम्ही एक झालो आहोत हे . तसंच आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, त्याच्यासाठी आम्ही काम करु एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com