Muralidhar Mohol and Shahaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Muralidhar Mohol - Video : ..अन् मोहोळांनी रस्त्यात अचानक वाहनताफा थांबवत 'त्या' वाहतूक पोलिसाची घेतली गळाभेट!

Murlidhar Mohol Meet Traffic Police Constable : जाणून घ्या, नेमकं काय घडलं? हा क्षण पाहून उपस्थितांनाही कौतुक वाटलं, घटनेचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल!

Mayur Ratnaparkhe

Muralidhar Mohol and Shahaji Patil : कोल्हापुरातील शिवाजी पाटील यांच्या चंदगड मतदारसंघात केंद्रीयमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळे हे एका सभेसाठी गेले होते. सभेच्या ठिकाणाहून निघताना बंदोबस्तासाठी जे पोलिस होते, त्यातील एका वाहतूक पोलिसाला पाहून केंद्रीयमंत्री मोहोळ यांनी आपला वाहनांचा ताफा थांबवला आणि थेट त्या पोलिसाची गळाभेट घेतली. या प्रकारामुळे सगळेचजण आवाक झाले. मात्र हा वाहतूक पोलिस मुरलीधर मोहोळ यांनी ज्या तालमीत कुस्तीचे धडे घेतले त्या तालमीतील मित्र असल्याचे नंतर समोर आले. खासदार मित्र आपल्या पोलिस मित्राला पाहून त्याची गळाभेट घेत असल्याचा हा प्रसंग, बघितल्यानंतर खासदार मोहोळ यांच्या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

या वाहतूक पोलिसाचं नाव शहाजी पाटील असं आहे. जे सध्या वाहतूक शाखेत हवालदार पदावर कार्यरत आहेत. मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) आणि शहाजी पाटील हे कोल्हापुरातील तालमीतील मित्र होते. आपला मित्रच आपल्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सांभाळत असल्याचे पाहून मुरलीधर मोहोळ यांना त्याची भेट घेतल्याशिवाय रहावले नाही आणि त्यांनी गाडीतून उतरून आपल्या मित्राला मिठी मारत त्याची विचारपूस केली आणि आनंदही व्यक्त केला.

दोन जुन्या मित्रांची रस्त्यात भेट झाली आणि जुन्या आठवणींना क्षणभर उजाळा आला. तर दोन मित्राची अशी अचानक भेट पाहून उपस्थितांनाही कौतुक वाटले. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मित्र सध्या एकप्रकारे देशसेवाच करत आहेत.

आपल्या जुन्या मित्राला भेटल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवत केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'काय भारी वाटलं रे शहाजी. वा भारी वाटलं ना..' यावेळी शहाजी पाटील हे आपल्या केंद्रीयमंत्री झालेल्या मित्रासोबतचा हा क्षण आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड करू लागले. त्यांनी उपस्थितांपैकी एकाला आपला मोबाइले देत फोटो काढून घेतला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'तालमीतील मित्र भेटला.' तू सध्या इकडे आहेस काय? अशी विचारणा केल्यावर शहाजी पाटील म्हणाले नाही 'सध्या बंदोबस्त लागल्याने आलो आहे.' त्यावर मोहोळ यांनी हसून म्हटले की 'मित्राच्या बंदोबस्ताला मित्र आला आहे. कसा आहेस, चांगलं सुरू आहे ना? तुला भेटून छान वाटलं. शहाजी येवू का? भेटूयात पुन्हा. उतरल्याशिवाय पर्याय नाही, शेवटी मित्र भेटला. चल येऊ का... ' असं म्हणत मोहोळ यांनी आपल्या खास मित्राचा निरोप घेतला आणि त्यांचा वाहन ताफा पुढे मार्गस्थ झाला.

तर दुसरीकडे आपल्या तालमीतील मित्र जो आज थेट केंद्रीयमंत्री मंडळात पोहचलाय, त्याने आपली अचानक भेट घेत आपली विचारपूस केल्याने, भारावलेले शहाजी पाटील यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र ओसंडून वाहताना दिसत होता. तसेच, एवढ्या मोठ्या पदावर असतानाही कसलीही तमा न बाळगता वाहन ताफा थांबून आपली गळाभेट घेत, खांद्यावर हात ठेवत विचारपूस केल्याने शहाजी पाटील यांची छाती मित्राच्या साधेपणामुळे अधिकच फुलली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT