Pune Congress : पुण्यातील काँग्रेस इच्छुकांचे भवितव्य ठाकूरांच्या हाती!

Assembly Election 2024 : काँग्रेसने जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाबरोबरच खेड, शिरूर आणि दौंड या मतदारसंघांवरही दावा केला आहे. काँग्रेसकडे स्ट्रॉंग उमेदवार असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune, 13 October : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. मतदारसंघामधून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राप्त इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती राज्यभरात घेतल्या जात आहेत आणि या मुलाखतींच्या आधारे काँग्रेस उमेदवारी निश्चित करणार आहे.

पुणे (Pune City) शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठीही इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते. त्यानुसार पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 24 इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातूनही जवळपास 50 हून अधिक इच्छुक काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील काँग्रेस भवन येथे होत आहेत.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने (Congress) दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Congress
Haryana Assembly Election : हरियाणा निवडणुकीचा भाजपचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

सध्या पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. कसबा पेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर, भोरमध्ये संग्राम थोपटे आणि पुरंदरमध्ये संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाबरोबरच खेड, शिरूर आणि दौंड या मतदारसंघांवरही दावा केला आहे. काँग्रेसकडे स्ट्रॉंग उमेदवार असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे.

विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची ही सर्वात चांगली संधी असल्याचे यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूतोवाच केले आहे. त्या दृष्टिकोनातून काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

Congress
Baba Siddique : सिद्दीकींच्या हत्येनंतर राऊत संतापले; ‘फडणवीसांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करा’

या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी काँग्रेस आमदार आणि राज्यातील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि केंद्रातून आलेले काँग्रेसचे निरीक्षक जगदीश ठाकूर यांच्यावर देण्यात आली आहे. या मुलाखतींच्या आधारे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केंद्रातील नेते उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहेत, त्यामुळे पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांचे भवितव्य हे दोन ठाकूर ठरवणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com