अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रियेने श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. श्रीगोंद्यातील नागवडे साखर कारखान्यावर राजेंद्र नागवडे यांनी वर्चस्व राखले. तर श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Banudas Murkute ) यांच्या समोर त्यांचीच सून असलेल्या डॉ. वंदना मुरकुटे ( Dr. Vandana Murkute ) व शेतकरी संघटनेने मोठे आव्हान उभे केले आहे. या अशोक सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. Murkute's father-in-law Sune's political struggle will have a result tomorrow
या कारखान्यावर भानुदास मुरकुटे यांचे 30 पेक्षाही जास्त वर्षांपासून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांना माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजिव करण ससाणे यांनी साथ दिली आहे. तर शेतकरी संघटनेने त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. शेतकरी संघटनेच्या पॅनेलमध्ये श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांचाही समावेश आहे. त्यामुळे कधी नव्हेते अशोक साखर कारखाना निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान उभे राहिले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी (ता. 16) मतदान प्रक्रिया झाली. कारखान्याच्या 11 हजार 774 सभासद मतदारांपैकी 10 हजार 898 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्यासाठी एकूण 93 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणातील 42 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या (सोमवारी) थत्ते मैदानावर सकाळी नऊपासून मतमोजणीला सुरवात होणार आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे लोकसेवा विकास मंडळ व शेतकरी संघटनेचे ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी टाकळीभान गटातून 2615, वडाळा महादेव गटातून 2239, कारेगाव गटातून 2669, पढेगाव गटातून 2228, उंदीरगाव गटातून 2074, असे 11 हजार 774 मतदार आहेत. त्यापैकी 10 हजार 898 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या कोणाची सरशी होते, याची चर्चा परिसरात सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.