Maharashtra Budget Session Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : फडणवीसांची शिवप्रेमींना मोठी भेट; शिवनेरीवर उभारणार शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Vijaykumar Dudhale

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिथीनुसार साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींना मोठी भेट दिली आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी, तसेच आंबेगाव (जि. पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटींची घोषणा केली आहे.  शिवनेरीवर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. तसेच,  शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली. (Museum on the biography of Shivaji Maharaj to be built at Shivneri: Devendra Fadnavis)

जगद्‌गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून ‘टिकवावे धन, ज्याची आस करी जन’ या तत्वाला अनुसरून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील योजना तसेच गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तरतुदीची घोषणा केली.

फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पुण्यातील आंबेगाव (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानास ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच,  मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी  २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपी शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या  शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याचबराेबर  शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

पाच ध्येयांवर आधारित अर्थसंकल्प (पंच अमृत)

१) शाश्वती शेती-समृद्ध शेतकरी

२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विाकस

३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

४)रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा

५) पर्यावरणपूरक विकास

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात जाहीर केली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करतो. या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सहा हजार रुपयांची भर घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील १ कोटी १५ लख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी ६ हजार नऊश कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT