Assembly Session News: पन्नास खोके अन्‌ बिल्कुल ओके...नागालॅंड ओके...! : विधानसभेत गुलाबरावांनी काढली राष्ट्रवादीची कुरापत

Gulabrao Patil: ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती वेगळी आहे. तेथील राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, हा इतिहास आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: नागालॅंडमध्ये (Nagaland ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) सत्तारूढ पक्षाला समर्थन दिले आहे, त्यावरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेत आज त्याच मुद्यावरून पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला. नागालॅंडमध्येही ‘पन्नास खोके आणि बिल्कुल ओके...नागालॅंड ओके, असं झालंय का, असा बोचरा सवाल पाटील यांनी सभागृहातच राष्ट्रवादीला केला. (Confusion in Assembly over support for NCP in Nagaland)

गुलाबराव पाटील म्हणाले की, देशात व राज्यात बदलाचे वारे वहायला लागले, अशी बरीचशी विधाने वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवरील बातम्यांमधून दिसत आहे. काल एक स्टेटमेंट पाहिले आणि आज बातम्याही ऐकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालॅंडमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहेत, बघा. नागालॅंडमध्येही पन्नास खोके आणि बिल्कुल ओके झालंय का, असा प्रश्न मला स्वतःला पडला आहे. तशी शंका निर्माण झालेली आहे.

Gulabrao Patil
Assembly Session News: शेतकरीप्रश्नावर विधानसभेत प्रचंड गोंधळ; गदारोळातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विरोधकांचा सभात्याग

एकीकडे महाराष्ट्रात जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे नागालॅंडमध्ये मांडीला मांडी लावून बसायचं. बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहेत, अशा प्रकारचं चित्र निर्माण झाले आहे. आमचं म्हणणं आहे की, पन्नास खोके आणि बिल्कुल ओके...नागालॅंड ओके, असं झालंय का, असा माझा सवाल आहे, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

त्यावरून चिडलेल्या राष्ट्रवादीने गुलाबराव पाटील यांना सुनावले. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती वेगळी आहे. तेथील राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, हा इतिहास आहे. त्याची चर्चा विधानसभेत करायचे काहीच कारण नाही.

Gulabrao Patil
Dipali Sayyed News: ''अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगलं बोलतात,मात्र...''; दीपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट

मंत्री पाटील हे चुकीची माहिती देत आहे. नागालॅंडचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा दिलेला आहे, भाजपला नाही. हे म्हणजे बेगाने शादीमें अब्दुल्ला दिवाना, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले.

मुख्यमंत्रीही उतरले मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान न झाल्याने आमदारांनी गोंधळ घातला. तुम्ही आमच्यावर रोज खोक्याचा आरोप करता. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा म्हणजे असं कसं होईल. आपल्या सोयीचं असं कसं होईल. शरद पवार जे बोलतात, त्याच्या विरोधी होते. जसं नागालॅंडमध्ये झालं, पाठिंबा न मागता दिला. तसं २०१४ मध्ये झालं होतं. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये. समोरून आमच्यावर दररोज असे आरोप झाले नाही पाहिजेत, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com