Kolhapur Gazette News : मराठा आंदोलनात कोल्हापूर गॅझेटकडे दुर्लक्ष केले आहे. कोल्हापुरातून पहिले आरक्षण लागू झाले. पण राज्य सरकारने कोल्हापुरकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी करत मराठा आरक्षणासंदर्भात मोठी मागणी केली आहे. त्यांनी, कोल्हापूर गॅझेट सुद्धा लागू झाले पाहिजे, अशी मागणी करत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी, मनोज जरांगे यांना हैद्राबाद गॅझेट जवळचं अन् कोल्हापूर लांबचं वाटतं असल्याचीही खंत व्यक्त केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच यावेळी त्यांनी, शेतकरी नेहमी उन्हात असतो. त्यामुळे उन्हाची आम्हाला सवय आहे. सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये. आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास उद्रेक होईल, असाही इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
सर्वात आधी राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण दिलं होतं. मात्र याच कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅजेटचा विचार केला जात नाही. त्यामुळे आता कोल्हापूर गॅजेटचा विचार केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते आणि कोल्हापूर गॅझेट लांबचे वाटते, अशीही खंत व्यक्त केली.
आतापर्यंत मराठ्यांची फसवणूक झाली आहे. मराठा समाजाला काही मिळाले नाही. मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील आणि शासन यांच्यामध्ये काय घडतंय हे आम्हाला कळत नाही.
माध्यमांमधूनच आम्हाला जे काही घडत असल्याचं कळत आहे. शासन आणि जरांगे पाटील या दोघांमध्ये काय चाललं हे आम्हाला कळत नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्व मराठे त्यांच्या बाजूने उभा राहतील. असेही खासदार शाहू महाराज म्हणाले.
मनोज जरांगे पाटील उन्हामध्ये बसले आहेत. तसे आम्ही देखील उन्हामध्येच बसलो आहोत. मराठा हा शेतकरी आहे. उन्हामध्ये बसल्याने काही परिणाम होणार नाही. शासन नेमकी काय भूमिका घेत आहे. हे आत्ताच सांगता येत नाही. काय वाटाघाटी सुरू आहेत. हे समजल्यावर याच्यानंतर बोलता येईल. मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.