Jyoti Waghmare join shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : माझा शिवसेना प्रवेश सुषमा अंधारेंना उत्तर देण्यासाठी नाही : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्योती वाघमारेंची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी निभावणार; जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश

अरविंद मोटे

सोलापूर : मी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) देतील ती जबाबदारी निभावणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी भीमशक्ती-शिवशक्ती यांना एकत्रित आणण्याचे ऐतिहासिक काम केले, त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन चालणाऱ्या शिवसेनेत काम करणार असल्याचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितले. (My Shiv Sena entry is not to answer Sushma Andhare: Jyoti Waghmare)

मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते सोलापूर विमानतळावर आले होते. त्याठिकाणी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ज्योती वाघमारे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते.

ज्योती वाघमारे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोनच दिवसांत त्यांना पदनियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे. ज्योती वाघमारे यांनी यापूर्वी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष म्हणून दीड वर्षे काम पाहिले आहे. त्यानंतर मागील सात ते आठ वर्षे त्या राजकरणापासून दूर होत्या. आता शिवसेनेकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आंबेडकरी चळवळीचा वैचारिक वारसा, अभ्यासू व विचारपूर्वक मांडणी करता येणारे वक्तृत्व यामुळे त्यांना प्रदेश प्रवक्ते पद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहे.

वैचारिक विरोध असू शकतो. राजकीय विरोधक असणे हे देखील स्वाभाविक आहे. मात्र, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती असणे चुकीचे आहे. माझ्या राजकीय प्रवेशबरोबरच माझा शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी केला जात असल्याची चर्चा चुकीची आहे. अंधारे विरुद्ध वाघमारे अशी मांडणी करणे चुकीचे आहे, असे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT