लखनऊ : गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांचा शनिवारी (ता. १५ एप्रिल) रात्री उशिरा प्रयागराज येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. हल्ला होण्यापूर्वी पोलिसांच्या (Police) चौकशीत अतिक अहमदने १४ मोठी नावे सांगितली होती. त्यात पाकिस्तानमधून राजस्थानमार्गे (Rajasthan) शस्त्र पुरविणाऱ्या व्यक्तीचे नावही घेतले होते. त्यातून काही ‘व्हाईट कॉलर’ गुंडांची नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar pradesh) पोलिसांनी त्या दिशेने वेगवान चौकशी सुरू केली आहे. (Before the attack, Atique Ahmed mentioned the names of 14 people)
प्रयागराजमधील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार करण्यात आला. त्यापूर्वी चौकशीत अतिक अहमदने १४ नावांचा खुलासा पोलिसांकडे केला आहे. त्यात मेरठचा माफिया बदनसिंग बद्दो याचेही नाव आहे. यासोबतच अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या लखनऊच्या साथीदाराचाही शोध सुरू आहे, ज्याने ही रक्कम दिली होती.
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे शस्त्रे पोहोचविणाऱ्या व्यक्तीचे नावही अतिकने सांगितले होते. तो राजस्थानचा रहिवासी आहे. यूपी एसटीएफ आणि एटीएसने त्या दिशेने तपासाचा वेग वाढविला आहे. त्यातून अनेक मोठी नावे समोर येऊ शकतात, काही व्हाईट कॉलरचाही यात समावेश असू शकतो.
अतिक अहमद आणि अशरफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात तीन आरोपींशिवाय आणखी दोन सूत्रधारांचा समावेश आहे. पोलिसांना त्याबाबत महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. एफआयआर नोंदविल्यानंतर त्याचा शोध सुरू आहे. दोन अनोळखी व्यक्तीविरुद्धही एफआयआरही दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे.
अतिक अहमद आणि अशरफ खून प्रकरणातील आरोपी लवलेशच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे. त्याचा माझ्या मुलाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे, प्रयागराजच्या एसआरएन हॉस्पिटलमध्ये कडेकोट बंदोबस्तात अतिक आणि अश्रफ यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. दफनासाठी दोन कबरी खोदल्या जात आहेत.
अतिकची पत्नी आत्मसमर्पण करणार
दरम्यान, उमेश पाल खून प्रकरणातील पाच लाखांचे इनाम असलेला फरारी आरोपी गुड्डू मुस्लिम याला अटक करण्यात आली आहे. यूपी एसटीएफने त्याला नाशिकमधून पकडले आहे. अतिकची पत्नी शाइस्ता परवीन आज आत्मसमर्पण करू शकते, अशा बातम्याही येत आहेत. उमेश पाल खून प्रकरणानंतर शाइस्ता फरारी आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानी चार तास उच्चस्तरीय बैठक
अतिक-अश्रफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी सुमारे चार तास उच्चस्तरीय बैठक चालली. या बैठकीत डीजीपी विश्वकर्माही सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.