Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar slams Ram Shinde : निरव मोदीने जमिन खरेदी केली तेव्हा राम शिंदे आमदार होते..; रोहित पवारांचा पलटवार

Nagar MIDC : श्रेय मला मिळेल म्हणून शिंदे हे सरकारवर दबाव आणून आहेत.

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar: कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यात कर्जत जामखेडमधील एमआयडीसीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी निरव मोदी याच्यासह अनेकांनी कर्जत-जामखेड परिसरात जमिनी खरेदी केल्याचा आरोप

आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केला. या जमिनींची खरेदी ही राम शिंदे आमदार असताना २०११ मध्येच झाल्याचा पलटवार रोहित पवारांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.

याबाबत रोहित पवारांनी निरव मोदी आणि त्यांच्याशी संबंधित ‘फायरस्टोन ट्रेडींग कंपनी प्रा.ली.यांनी २०११ मध्येच संबंधित जमीन खरेदी केल्याचे सांगितले. त्यावेळी प्रा. राम शिंदे हे कर्जत-जामखेडचे आमदार होते त्यामुळे या जमिन खरेदीचे धागेदोरे नेमके कुणाकडे जातात, असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्याकडेही अनेक वेळा पत्रव्यवहार करुन, प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला. तरीही याबाबत काहीही हालचाल होत नसल्याचे दिसताच सोमवारी (२४ जुलै) उपोषण आंदोलन केले.उपोषण मागे घेण्यासाठी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

पण दुसऱ्या दिवशी रोहित पवार यांनी चार तास वाट पाहूनही मंत्री बैठकीसाठी आले नाहीत. याबाबतची नाराजी रोहित पवारांनी बोलून दाखवली. गुरुवारी विधानपरिषदेत राम शिंदे यांनी या विषयावर चर्चा करताना मतदारसंघात निरव मोदी यांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला. त्यावर रोहित पवारांनी आता पलटवार केला आहे.

शिंदेंकडून सरकारवर दबाव..

सलग दहा वर्षे आमदार, त्यातील पाच वर्षे कॅबिनेटमंत्री राहिलेल्या नेत्याला स्वतःच्या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ आणता आली नाही. परंतु मी आमदार झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात एमआयडीसीच्या कामाला वेग दिला आणि हा विषय आता अंतिम टप्प्यात असताना सरकार गेल्यामुळे केवळ अधिसूचनेसाठी प्रलंबित आहे. अधिसूचना निघाली तर आतापर्यंत एखादा मोठा प्रकल्पही या ठिकाणी सुरु झाला असता आणि त्याचं श्रेय मला मिळेल म्हणून शिंदे हे सरकारवर दबाव आणून या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT