CA Vijay Marda Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar News : नगर शहर बँकेतील फसवणूक प्रकरणात सीए विजय मर्दा यांना पोलिस कोठडी

Vijay Marda : विजय मर्दा यांना दापोली (जि. रत्नागिरी) येथून काल अटक केली.

Pradeep Pendhare

Nagar Shahar Co-Operative Bank : नगर शहर सहकारी बँकेचे कर्जदार डॉ. रोहिणी सिनारे यांच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच प्रसिद्ध सीए विजय मर्दा यांना आर्थिक गुन्हे शाखा शाखेने अटक केली आहे. विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. १८) पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली. विजय मर्दा यांच्या अटकेमुळे बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

नगरच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सीए विजय मर्दा (CA Vijay Marda) यांना दापोली (जि. रत्नागिरी) येथून काल ताब्यात घेतले. मर्दा यांच्या अटकेनंतर नगरमधील बँकिंग क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. विजय मर्दा यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर गुन्ह्याचे गांभीर्य मांडले. यानंतर न्यायालयाने मर्दा यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे विजय मर्दा यांच्याकडून तपासात काय उघडकीस येणार, याकडे आता लक्ष लागले आहे. (Nagar shahar Co-Operative Bank cheating case)

बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी डॉ. रोहिणी भास्कर सिनारे (राहुरी), डॉ. उज्वला रवींद्र कवडे (श्रीरामपूर) आणि डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे (नगर) यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. या फिर्यादींनुसार अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, डॉ. नीलेश शेळके यांच्यासह २७ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सीए विनोद मर्दा यांना डॉ. सिनारे यांनी दिलेल्या फिर्यादीत अटक केली आहे.

विजय मर्दा यांच्यावर आहेत हे आरोप

फिर्यादी डॉ. रोहिणी सिनारे यांच्या नावावर घेतलेले कर्ज बनावट खात्यावर वर्ग केले गेले. ही रक्कम डॉ. नीलेश शेळके याने वापरली. सीए विजय मर्दा याने हा प्रकार माहीत होता. आयकर भरण्याचे काम विजय मर्दा यांनीच केले होते. सीए म्हणून सर्व माहिती असूनही ही गंभीर बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली नाही. फसवणूक करण्यास मदत केली. ही रक्कम रोख स्वरूपात काढली आहे. या कालावधीत सीए विजय मर्दा आणि डॉ. शेळके यांनी मालमत्ता खरेदी केली. या मालमत्ता खरेदीसाठी ही रोख रकमेचा वापरल्याचा संशय आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT