Sunil Shelke : आमदार शेळकेंचं 'हा सूर्य हा जयद्रथ'? म्हणाले," ज्या रोहित पवारांनी पत्र चोरल्याची टीका केली, त्यांनीच..."

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar : " ज्यांनी पत्र चोरलं अशी अजित पवारांवर टीका केली. त्याच रोहित पवारांनी..."
Sunil Shelke Vs Sunil Shelke
Sunil Shelke Vs Sunil Shelke Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी - विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झडत आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर सरकारसह अजित पवार गटावर एकापाठोपाठ टीकेचे बाण सोडत आहे. तसेच त्यांनी अजित पवार गटावर पत्र चोरल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आता याच त्यांच्या आरोपाला अजित पवार गटाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ पक्ष चिन्हावरुन निवडणूक आयोगात कायदेशीर सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर आमदारांच्या सह्या असलेलं पत्र चोरल्याचा आरोप केला. यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

Sunil Shelke Vs Sunil Shelke
Krishna Janmabhoomi Case : काशीनंतर आता मथुरेतील शाही मशिदीतही होणार सर्वेक्षण; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील रोहित पवारांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. त्यांनी सत्ता सहभागाच्या पत्रावरील सह्याच नाही तर थेट आमदार पवार यांना थेट तारखाच सांगितल्या आहेत. ज्या तारखांना रोहित पवार यांनी सत्तेत सहभागी व्हावं असं मत व्यक्त केले होते.

मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, ज्यांनी पत्र चोरलं अशी अजित पवारांवर टीका केली. त्याच रोहित पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या पत्रावर तीनवेळा सह्या केल्या असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी 22 जून 2022 मंत्रालयातील अजित पवारांचं दालन ,2 जुलै वायबी सेंटर आणि त्याचदिवशी म्हणजे 2 जुलै रोजी मुंबईतील देवगिरी बंगला अशा तीन पत्रांवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) सह्या केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शेळके म्हणाले, महाविकास आघाडी सरकार 20 जून 2022 ला कोसळत आहे हे लक्षात आल्यावर त्यावेळी पक्षातील सर्व नेत्यांनी एकमताने अजित पवार जे म्हणतील त्याला आपला पाठिंबा असेल असा निर्णय केला. याबाबतचे एक पत्रही तयार करण्यात आले. यावेळी एकूण राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) चे 47 आमदार उपस्थित होते. त्यात भाजपसोबत जाण्याचे ठरले. याच पत्रात माझ्या आधी रोहित पवार यांनी सही केली होती असा दावा आमदार शेळके यांनी केला आहे. पण या पत्रावेळी अजित पवार यांनी सांगितले की भाजप सोबत आपल्याला जायचं नाही.त्यांनी नकार दिल्याचेही ते म्हणाले.

तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी 2 जुलै 2022 ला पुढाकार घेत अजित पवारांना विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय वाय बी चव्हाण सेंटर येथील बैठकीत झाला.यावर 32 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जायचं ठरलं होतं. त्यावेळी 52 आमदारांनी सह्या केल्या होत्या.

याचवेळी मुंबईतील देवगिरी या बंगल्यात सत्तेत सहभागी व्हायला हवं असं आम्हांला आम्ही 2 जुलै 2023 रोजी महायुतीत गेलो. त्यावेळी रोहित पवार यांना विचारलं देखील नाही.आम्ही निर्णय घेतला आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सांगितलं आणि आम्ही सत्तेत सहभागी झालो.

Sunil Shelke Vs Sunil Shelke
Pune News : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवेघाटाची वाट होणार सोपी, सुप्रिया सुळेंनी दिली मोठी माहिती

" स्वत:च्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते..."

आमदार सुनील शेळकेंनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, जे स्वत:च्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते आमचे नेते कसे काय होतील? पक्ष कसा काय सांभाळतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात स्वयंघोषित संघर्ष योद्धा म्हणून ज्यांनी यात्रा काढली, त्यांना अजित पवार यांच्यावर बोलायचं अधिकार नाही. कारण अजित पवार यांनी इतरांच्या मतदारसंघापेक्षा रोहित पवार यांच्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी दिला आहे असेही शेळके यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Sunil Shelke Vs Sunil Shelke
Supreme Court : राहुल गांधी केसचा संदर्भ देताच बसपा नेत्याला दिलासा; पुन्हा मिळणार खासदारकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com