Rajendra Nagawade

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

नागवडे साखर कारखाना निवडणूक काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्यात होत आहे.

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. हे निवडणूक काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्यात होत आहे. बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नागवडे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राजेंद्र नागवडे यांनी प्रतिउत्तर दिले. Nagwade said to Pachpute, 'You' are the MLAs because of us ...

वांगदरी येथे आज शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेलच्या प्रचारास प्रारंभ झाला. या प्रसंगी राजेंद्र नागवडे बोलत होते. त्यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण पाचपुते होते.

राजेंद्र नागवडे म्हणाले की, आम्ही शिवाजीराव बापूंच्या संस्कारात वाढलो असल्याने मर्यादा ओलांडणार नाहीत. कारखान्यात कारभार चोख केला. त्याचे उत्तर निवडणूक निकालात मिळेलच. विधानसभेत आपण गेलाही नसता पण आम्ही मदत केली म्हणून तु्म्ही आमदार झालात. या उपकाराची जाणीव ठेवताल असे वाटत होते. मात्र, ती विसरुन विरोधात पॅनेल केले. तुम्ही नाही ठेवली मात्र, तुमचे कार्यकर्ते उपकाराची जाणीव ठेवून आमच्यासोबत राहतील, असा पलटवार आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर राजेंद्र नागवडे यांनी केला.

नागवडे पुढे म्हणाले, की तालुक्याच्या विकासात आयुष्यभर झटणाऱ्या शिवाजीराव नागवडे यांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक आहे. बापूंनी कारखाना व आमदारकीच्या माध्यमातून तालुक्याचा विकासात्मक कायापालट केला. त्यांनी राजकारणात कधीच खुंशी राजकारण केले नाही. आम्हीही त्यांच्याच संस्कारात शिकलोय. कारखान्याचा कारभार कसा आहे हे विरोधकांनी सांगण्याची गरज नाही ते राजकारण करतात कारभार कसा आहे याचे उत्तर निवडणूक निकालात मिळेल.

विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचा पराभव ठरलेला होता. मात्र आम्ही त्यांना साथ दिली. त्यांच्यासाठी झटलो म्हणून ते आमदार झाले. ते आज काहीही म्हणत असले तरी त्यांच्या अंतकरणाला माहिती आहे ते कुणामुळे आमदार आहेत. आमदारकीचे उपकार म्हणून ते कारखाना बिनविरोध करण्यासाठी आम्हाला मदत करतील, असे वाटत होते. प्रत्यक्षात तेच समोर आमच्याविरोधात उतरले. त्यांना माहिती नाही आमच्या उपकाराची जाणीव त्यांना नसेल पण त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच आहे. सभासद असणारे पाचपुते यांचे कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचा दावाही नागवडे यांनी केला.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले की, बापूंनी ज्यांना उपाध्यक्ष केले तेच आज त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात आग ओकत आहेत. सभासद तुमच्या सोबत नाहीत हे निकालात समजेल. बापूंच्या बोटाला धरुन राजकारण करणाऱ्यांनी खोटे आरोप करताना भान ठेवावे, असे भोस यांनी सांगितले.

त्यांना पराभूत व्हावे लागेल

आमदार बबनराव पाचपुते यांनी या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी करायला लावायला नको होती, कारण त्यांना आता पराभूत व्हावे लागणार असल्याचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT