बबनराव पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पैशाची गुर्मी...

नागवडे साखर कारखाना निवडणुकीत ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) विरुद्ध आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) असा संघर्ष पहायला मिळत आहे.
Babanrao Pachpute

Babanrao Pachpute

Sarkarnama

Published on
Updated on

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : श्रीगोंदे तालुक्यातील दोन साखर कारखान्याच्या निवडणुका आहेत. यातील कुकडी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बिनविरोध करून दाखविला. मात्र नागवडे साखर कारखाना निवडणुकीत ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) विरुद्ध आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) असा संघर्ष पहायला मिळत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना राजेंद्र नागवडे यांच्यावर जोरदार टीका केली. Babanrao Pachpute said, Rajendra Nagwade has a lot of money ...

बबनराव पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व माया जमवून कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दोन खासगी कारखाने घेत मोठी संपत्ती जमवली आहे. त्यांना पैशाची मोठी गुर्मी असून लोकांपेक्षा पैसा त्यांना महत्वाचा झाला आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत त्यांची ही गुर्मी उतरणार असून कारखान्याच्या सत्तेत परिवर्तन ठरलेले असल्याचा दावा भाजप नेते आमदार बबनराव पाचपुते यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Babanrao Pachpute</p></div>
नागवडे साखर कारखाना निवडणूक : समर्थकांचा बबनराव पाचपुते यांना सर्वाधिकार

पाचपुते पुढे म्हणाले की, राजेंद्र नागवडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षात आले. मात्र ते माझ्या मदतीसाठी नव्हे तर त्यांनी जमलेल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी भाजपला जवळ केले.

जिल्हा परिषद निवडणुकीत दोन कोटीची संपत्ती असणाऱ्या व्यक्ती अचानक 68 कोटी रुपये बँकेत भरणा कशी करू शकते ? असा सवाल करीत पाचपुते म्हणाले, नागवडे यांनी गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी होऊ शकते. या भीतीपोटी ते भाजपमध्ये आले. त्यांची मला विधानसभेत कुठलीही मदत झाली नाही. नंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर भाजपमधून ते कधी बाहेर गेले हे मलाही समजले नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

<div class="paragraphs"><p>Babanrao Pachpute</p></div>
अनुराधा नागवडे म्हणाल्या, भाजप घाणेरडे राजकारण करतेय

कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मोठे घोटाळे केले आहेत. जवळच्या व्यक्तीने विरोध केला तर त्यांना लांब करण्याची खेळी करत कारखान्यातील भ्रष्टाचारातून खासगी उद्योग उभारले. आता हे सगळे सभासदांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची सत्ता जाणार हे नक्की झाल्याने संपत्तीचे प्रदर्शन सुरू केले आहे.

पैशाच्या जीवावर सभासद खरेदी करू शकतो. याची त्यांना मोठी गुर्मी असून त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कारखान्याचा सभासद हा ऊस उत्पादक बागायतदार आहे. त्याला पैशाने खरेदी करणं शक्य होणार नसून सभासद आमच्या समवेत असून यावेळी नागवडे कारखान्यात परिवर्तन ठरलेले आहे. आम्ही निवडणूक बिनविरोध करू शकत होतो, मात्र आम्हाला एकही जागा देणार नाही असे सांगत नागवडे यांनी आम्हाला झिडकारले. त्यांची ही गुर्मी सभासद उतरवतील असा दावा पाचपुते यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com