Nana Patole Vs Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole Vs Dhananjay Mahadik: महाडिकांना पटोलेंचा सूचक इशारा; 'आम्हीही बोलू शकतो, पण...'

Nana Patole at Satara News : 'फक्त आचारसंहिता लागू द्या, त्यानंतर सौ सोनार की एक लोहार की, हे तुम्हाला पाहायला मिळेल.' असंही पटोले म्हणाले आहेत.

Umesh Bambare-Patil

Satara Congress News : काँग्रेसच्या घोटाळ्यांची श्वेतपत्रिकेवर त्यांच्या एकाही नेत्याने घोटाळ्यांबाबत चकार शब्द काढला नाही,अशी टीका कोल्हापूरचे भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती.या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले.

श्वेतपत्रिकेची गप्पा मारणारे खासदार धनंजय महाडिक हे आमचे मित्र आहेत. बोलायचे म्हटलं तर, आम्हीही बोलू शकतो, पण,आता ती वेळ नाही,असा सूचक इशारा त्यांनी दिला.

सातारा काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) हे कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

केंद्र सरकारने यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांबाबत काढलेल्या श्वेतपत्रिकेसंदर्भात पटोले म्हणाले, 'विरोधी गटातील 156 खासदार निलंबित करून बाहेर काढले. आपल्याच खासदारांमध्ये स्वतःला सोयीस्कर ठरतील असे कायदे संमत करून घेणे ही भाजपाची सरळ सरळ हुकूमशाही आहे. फक्त आचारसंहिता लागू द्या, त्यानंतर सौ सोनार की एक लोहार की, हे तुम्हाला पाहायला मिळेल. मग कोण कोणत्या पक्षात जाते हेही तुम्हाला लवकरच दिसून येईल.' असा दावा त्यांनी केला.

'इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत उलट जे बाहेर पडले त्याचा आघाडीला फायदाच झालेला आहे. श्वेतपत्रिकेची गप्पा मारणारे खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) हे आमचे मित्र आहेत आम्ही घोटाळ्यांबाबत चकार शब्द काढला नाही असे नाही त्यात किती तथ्य आहे, हे पाहणे गरजेचे आहे. बोलायचे म्हंटले तर आम्हीही बोलू शकतो, पण मात्र आत्ता ती वेळ नाही.' असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते धनंजय महाडिक? -

'केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती. याला काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. ही घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट्य कोणीही केलेले नाही. याचा अर्थ विरोधी आघाडीने हे सर्व स्वीकारले आहे, असाच होतो,' अशी टीका भाजपचे कोल्हापूरचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी साताऱ्यात केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT