Nana patole's Helicoptar
Nana patole's Helicoptar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नानांची दिलदारी : चिमुकलीसाठी हेलिकॉप्टर देत स्वतः रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : आपल्या वाणीमुळे अनेकदा अडचणीत सापडलेले काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यातील हळव्या माणसाचे दर्शन आज (ता. १३ मार्च) सोलापूकरांना झाले. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या चिमुकलीला उपचारासाठी तातडीने मुंबईला जायचे होते. स्थानिक आमदार प्रणिती शिंदे यांनी ही अडचण पटोले यांच्या कानावर घालत हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. जराही वेळ न दवडता नानांनी चिमुकलीसाठी हेलिकॉप्टर दिले आणि स्वतः रेल्वेने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या औदार्याची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे. (Nana Patole gave little girl her own helicopter to go to Mumbai for treatment)

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले हे पहिल्यांदाच सोलापुरात आले होते. विजय संकल्प मेळावा, भटक्‍या विमुक्तांचा मेळावा असे आज सोलापुरात त्यांचे कार्यक्रम होते. मुंबईला परत हेलिकॅप्टरने जाण्याऐवजी हृदयरोगाने ग्रस्त असल्याने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला हेलिकॅप्टर देऊन स्वत: मात्र रेल्वे जाण्याचा निर्णय नाना पटोले यांनी घेतला.

उंजल तुकाराम दासी (वय ४) या लहान मुलीला हृदयविकाराचा त्रास होता. या चिमुकलीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. उपचाराकरीता मुंबई येथे जाण्याची आवश्यकता होती. तिचे वडील तुकाराम दासी (रा. सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.

उंजल हिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यावेळी नाना पटोले यांनी उंजल दासी हिला उपचारासाठी पाठविण्याकरीता हेलिकॅप्टर देण्याचा एका झटक्यात निर्णय घेतला. त्यानुसार नाना पटोले यांनी मात्र स्वत: रेल्वेने परत जाण्याचे ठरवून उंजल तुकाराम दासी हिला मुंबई येथे हृदयविकाराच्या उपचाराकरीता पाठविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT