खडसेंच्या सांगण्यावरूनच गिरीश महाजनांना अडकवण्याचा प्लॅन : मोरेंचा नवा बॉम्ब

गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी भोईटेंच्या घरात खोटे पुरावे ठेवण्यात आले : तेजस मोरे
Girish Mahajan, Tejas More, Eknath Khadse
Girish Mahajan, Tejas More, Eknath KhadseSarkarnama

मुंबई : माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडवण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय भोईटे यांच्या घरात खोटे पुरावे ठेवण्यात आले होते. तसेच, महाजन हे ड्रग्ज इंडिकेट्‌स आहेत, हे दाखवण्यासाठी एकाला माफीचा साक्षीदार करण्यात येणार होते. हे सर्व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सांगण्यावरून आपण करत आहोत, असे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला सांगितले होते, असा खळबळजनक आरोप तेजस मोरे (Tejas More) यांनी आज केला. त्यामुळे चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. (False evidence kept in Bhoite's house to trap Girish Mahajan : Tejas More)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावमधील तेजस मोरे यांनी हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोरे यांनी आज माध्यमांपुढे येत चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. ते स्टिंग ऑपरेशन मी केलेले नाही. तसेच, चव्हाण यांना मी कसलेही घड्याळ भेट दिलेले नाही. कोणताही पुरावा न देता ते माझ्यावर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा पलटवार मोरे यांनी केला. तसेच, गिरीश महाजन यांच्यासंदर्भातही त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली.

Girish Mahajan, Tejas More, Eknath Khadse
तेजस मोरेंचा नवा गौप्यस्फोट; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

तेजस मोरे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित ४२ जबाब घेण्यात आले आहेत, त्यातील १० ते १२ मी नोंदविले आहेत. महाजन ड्रग्ज इंडिके्टस आहेत, हे दाखवण्यासाठी एकाला माफीचा साक्षीदार करण्यात येणार होते. त्यातून महाजनांवर मोका लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता. त्याबाबतचे चॅटिंगचे पुरावे माझ्याकडे आहेत. जळगावात पुणे पोलिसांनी ९ जानेवारी रोजी छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांच्या जेवणाचे बिल मी ‘गुगल पे’ वरून दिले होते. छापा पडल्यानंतर माझा एक माणूस पंच म्हणून दिला होता, तो खोटा होता. छाप्यावेळी महाजनांशी संबंधित असलेले भोईटे यांच्या घरात खोटे पुरावे ठेवण्यात आले होते.

Girish Mahajan, Tejas More, Eknath Khadse
फडणवीसांना अटक केल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल : हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा

सरकारी वकिल प्रवीण चव्हाण तेव्हा सांगायचे की एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरूनच हे आपण करत आहोत. गिरीश महाजन यांना मोका लावून अटक करण्याचा प्रयत्न होता. महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखही त्याबाबत सांगायचे, असे सांगून मोरे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या प्रकरणातील फिर्यादी आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून माझा त्यावेळी वापर करण्यात आला. सरकारी वकिल आणि फिर्यादी हे एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे फिर्यादीला काही जबाब द्यायचे असतील, तर ते मला पाठवयाचे आणि ते मी चव्हाणांना द्यायचो. तसेच, चव्हाण यांचे काही संदेशही मी फिर्यादीला द्यायचो, असेही त्यांनी सांगितले.

Girish Mahajan, Tejas More, Eknath Khadse
व्होरा समितीच्या अहवालात कळेल दाऊदशी कोणाचे संबंध : नारायण राणेंचा नवा बॉम्ब

माझ्यासमोर अनिल गोटे भेटायला आले होते

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना मी कोणतेही घड्याळ भेट दिलेले नाही. त्यामुळे स्टिंग ऑपरेशसंदर्भात ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. ज्यावेळी माजी आमदार अनिल गोटे हे चव्हाणांना भेटायला आले हेाते, त्यावेळी मी त्या ठिकाणी होतो. पण, त्यांची चर्चा केबिनमध्ये चालली होती. मला फक्त मंगेश चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची फाईल्स आणून देण्यास सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com