Nana Patole  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नाना पटोले महाबळेश्‍वरात; राष्ट्रवादीला देणार धक्का!

या कार्यक्रमास महाबळेश्वर Mahabaleshwar पालिकेतील १७ पैकी १३ नगरसेवकांनी Corporater विरोध केला आहे. कारण या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण नाही. नगररचना विभागाने या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी अधोरेखित करून त्या पूर्ण करण्याची सूचना पालिकेला केली आहे.

अभिजित खुरासणे

महाबळेश्‍वर : महाबळेश्वर पालिकेच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्केट इमारतीला होत असलेल्या विरोधामुळे महाबळेश्वर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवप्रतापदिनानिमित्त, तसेच कोविडच्या अनुषंगाने जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी नगरसेवकांची बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

महाबळेश्वर शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या पालिकेच्या भाजी, मटण व फिश मार्केट इमारतीच्या उद्‍घाटनाची पालिकेतील सत्ताधारी गटाने तयारी केली आहे. दुसरीकडे या उद्‌घाटनास पालिकेतील १७ पैकी १३ नगरसेवकांनी विरोध केला आहे. कारण या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण नाही. नगररचना विभागाने या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी अधोरेखित करून त्या पूर्ण करण्याची सूचना पालिकेला केली आहे.

दरम्यान, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी गटाने इमारत उद्‍घाटनाचा निर्णय घेतला आहे. या उद्‍घाटनाच्या समारंभासाठी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक मंत्री व मान्यवर नेत्यांना उद्या (गुरुवारी) आमंत्रित केले आहे; परंतु प्रशासकीय पातळीवर अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पालिकेतील १३ नगरसेवकांनी या उद्‍घाटनास तीव्र विरोध केला आहे. उद्या पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT