Nanded Murder News: मराठवाड्यात आज एका शिवसैनिकाची निघृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज सकाळी सहा वाजण्या सुमारात हा प्रकार घडला. सोनू कल्याणकर ( ३५ वर्षे ) असे या मृत युवकाचे नाव आहे. सोनू कल्याणकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. सध्या ते शिवसेनेत होते.
या घटनेमुळे श्रीनगर भागात काही काळ तणाव होता. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. सोनू कल्याणकर यांची हत्ये मागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी नांदेड पोलीस सखोल तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील श्रीनगर भागात सकाळी सहा वाजता तीन ते चार हल्लेखोरांना सोनू कल्याणकर यांचा रस्ता अडवला. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने कल्याणकर यांच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
तीन वर्षांपूर्वीही सोनू कल्याणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे.
नांदेडमध्ये हत्येची अक्षरशः मालिका सुरू झाली आहे. परवा तिघांची हत्या झाल्यानंतर काल देखील एकाची हत्या झाली होती. तर आज पहाटे सोनू कल्याणकर या श्रीनगर इथल्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत सोनूला संपवले. या हत्येचे कारण अद्याप अनिश्चित असून पोलीस घटनास्थळी जाऊन तपास करीत आहेत.
नांदेड आता 'शिक्षणाचे माहेरघर' उरले नसून 'रक्ताचे कोठार' झाले आहे, अशी टीका समाज माध्यमावर करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाची लाचारी आणि लोकप्रतिनिधींनी गुन्हेगारांना दिलेला राजकीय वरदहस्त यामुळेच आज सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. शहराचे वाटोळे करणाऱ्या या नेत्यांना आणि वसुलीत मग्न असलेल्या पोलिसांना आता जनतेनेच जाब विचारण्याची वेळ आली आहे, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.