Maharashtra Politics : वळसे पाटील, थोपटे, थोरात अन् भरणेमामांसह नऊ जण अपात्र, शासनाच्या निर्णयाने नेते अडचणीत

Cooperative Bank Election : सहकार बँकेच्या निवडणुकी संदर्भात नवीन कायद्याने दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे यांच्यासह पीडीसीमधील विद्यामान नऊ संचालक अपात्र ठरत आहेत.
Senior Maharashtra leaders Dilip Walse Patil, Sangram Thopte and Datta Bharane declared ineligible under new cooperative bank director election rules.
Senior Maharashtra leaders Dilip Walse Patil, Sangram Thopte and Datta Bharane declared ineligible under new cooperative bank director election rules.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सहकार मंत्रालयाने काढलेल्या नवीन आदेश काढला आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ज्या संचालकांनी १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण केला असेल,असे संचालक जिल्हा बँकेच्या पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा पीडीसीसी बँकेच्या विद्यमान नऊ संचालकांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

बँकिंग सुधारणा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सहकार मंत्रालयाने सहकार आयुक्तालयास ९ मार्च रोजी पत्र पाठवले आहे. त्यामुळे पीडीसीसी बँकेच्या विद्यमान २१ संचालकांपैकी दिग्गज व अनुभवी ज्येष्ठ ९ संचालकांना या कायद्याचा फटका बसू शकतो.

किंबहुना बँकेच्या संचालक मंडळातून त्यांना कायमचे पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुगाडे, आमदार दिलीप वळसे-पाटील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर, अॅड संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा समावेश आहे.

पीडसीसी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आता नऊ महिन्यांनंतर होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया किमान तीन महिने आधी सुरू होईल, असे नियोजन आहे.या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दहा वर्षांचे संचालक पदाच्या मर्यादेचा नियम लागू झाल्यास पर्यायी संचालक कोण असावा, याचा विचार काही संचालकांनी आत्ताच सुरू केला आहे.

त्यासाठी ते आता सोसायटीत आपल्या वारसदारांची/नातेवाइकांची नावे घुसवण्यास सुरुवात केली आहे. सोसायटीच्या माध्यमातून बँकेचा प्रतिनिधी म्हणून ठराव मंजूर करून त्यांना संचालक म्हणून निवडून आणण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे.

Senior Maharashtra leaders Dilip Walse Patil, Sangram Thopte and Datta Bharane declared ineligible under new cooperative bank director election rules.
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत मोठा उलटफेर; काँग्रेसचे दोन आमदार गायब, भाजपने डाव पलटवला?

जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या पुणे जिल्हा बँकेतूनच झाल्याने सर्वांचेच लक्ष सहकार विभागाच्या अंमलबजावणीकडे लागले आहे. तसे झाल्यास अनेक दिग्गजांना संचालक अपात्रतेचा धक्का बसू शकतो. म्हणजेच यापुढे 10 वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपद भूषवलेल्या विद्यमान संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुका लढता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेवर तालुक्यातून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे संचालकपदी बसणे आता बंद होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यताही निमर्माण झाली आहे. शिवाय तज्ज्ञ संचालक म्हणूनही नवीन नेतृत्वास संधी मिळू शकते.

Senior Maharashtra leaders Dilip Walse Patil, Sangram Thopte and Datta Bharane declared ineligible under new cooperative bank director election rules.
Nashik MHADA Fraud : पोलिसांकडून घरात घुसून धरपकड सुरु, नाशिकमध्ये बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com