Adam Master, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Modi In Solapur : आडममास्तरांची तब्येत अन् मोदींचा टोला; सोलापुरात नेमकं काय घडलं?

Adam Master : पंतप्रधान मोदींचे आडममास्तरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष...

Anand Surwase

Solapur Political News : जगातील सर्वात मोठ्या असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारच्या विविध योजना आणि दिलेल्या आश्वसानांच्या पूर्ततेची गॅरंटी यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी रे-नगरचे प्रवर्तक कॉम्रेड आडममास्तर यांच्या तब्येतीवरही मोदींच्या गॅरंटीचा परिणाम झाल्याचा मार्मिक टोला लगावला. फळे खाऊन खाऊन आडममास्तरांची जाडी वाढली आहे. मात्र ही यशाची फळे असल्याचे सांगत मोदी यांनी आडममास्तरांच्या कार्याचे कौतुकही केले.

माकपचे नेते आडममास्तर यांच्या दूरदृष्टीतून आणि संघर्षातून सोलापूरमध्ये असंघटित कामगारांसाठी 30 हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पातील 15 हजार घरांचे मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्तेच या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्याची आठवण करून देताना मोदींनी आडममास्तर यांच्या तब्येतीकडे लक्ष वेधले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, मी पाच वर्षांपूर्वी उद्घाटनासाठी आलो होतो, त्यावेळी आडममास्तरांची जाडी कमी होती. आता पाहतो तर काय, आडममास्तर हे फळे खाऊन जाड झालेले दिसत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कष्टाच्या यशाची फळे चाखल्यामुळे त्यांच्या तब्येतीत ही सुधारणा झाली आणि हा परिणामदेखील मोदींच्या गॅरंटीमुळे दिसून आला,' अशी भावनाही मोदींनी व्यक्त केली.

आडममास्तरांच्या कामगारांसाठी मागण्या

रे-नगरच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी या प्रकल्पाचे प्रवर्तक म्हणून माकपनेते आडममास्तरांनी (Adam Master) पंतप्रधान मोदींचे कौतुक कमी करीत थेट मागण्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी कामगारांचा हा गृह प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करीत अजराअमर काम केले. मात्र, देशभरात महिन्याला पाच हजार असंघटित कामगारांचे मृत्यू होत आहेत. अशा कामगारांना महिन्याला किमान 10 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घरांसाठी मिळणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. केंद्राने लावलेला 1 टक्के लेबर सेस कमी करावा, अशीही विनंती त्यांनी केली. तसेच मोदींनी लष्कराचे ड्रेस सोलापुरातून घेण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? असा सवाल करीत त्यांना त्यांच्या घोषणेची आठवण करून दिली. त्यामुळे आम्हाला ऑर्डर द्या, एक लाख रोजगारनिर्मिती होईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला.

मोदींचे मागण्यांकडे दुर्लक्षच

आडममास्तरांनी आपल्या प्रास्ताविकात केलेल्या मागण्यांवर पंतप्रधान मोदी काही तरी प्रतिसाद देतील अथवा कामगारांसाठी कोणत्यातरी नवीन योजनेची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी याबाबत एक शब्दही काढला नाही. याखेरीज आगामी काळात तिसऱ्या टर्ममध्ये आपणच पंतप्रधान असणार, म्हणून जाहीर करून टाकले. यासाठी कामगारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असेही आवाहन केले. आडममास्तरांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT