Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठ्यांची भीती; भाजपाचे मोदी आणि डेव्हलपमेंट कार्ड

BJP Politics : आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची सरकली वाळू
Maratha Reservation & Narendra Modi
Maratha Reservation & Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर त्याचबरोबर सरकारस्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारंवार महाराष्ट्र दौरे का? लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे दौरे आहेत का? कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन एकदम महाराष्ट्रात का? त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या मराठाबहुल राजकीय पक्षातून अजित पवार यांचा गट का फोडला? शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडू मिलिंद देवरा राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असताना अजित पवार गटाला राज्यसभेची एखादी जागा मिळेल का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सतत निर्माण होत आहे. त्याला कारणदेखील तितकेच ‘सॉलिड’ आहे. ते म्हणजे मराठा आरक्षण विषयात भाजपाचे झालेले पानिपत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनास मिळणारा वाढता पाठिंबा पाहता भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Maratha Reservation & Narendra Modi
Nanded Lok Sabha constituency : अशोक चव्हाण पराभव विसरणार? 'नांदेड'चा गड मिळवण्यासाठी 'वंचित'सोबत हवी!

शिवसेना व राष्ट्रवादी विभाजनाचे शल्य भाजपाला असून त्याचबरोबर मराठा मतदारांच्या नकाराची भीती निर्माण झाली आहे. त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी जोरदार कवायत सुरू आहे. 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी भाजपाच्या तुलनेत शिवसेनेला दिलेला अधिकचा कौल ही धोक्याची घंटा वाजवित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-ठाणे या परिसरात मराठा मतदारांनी थेट शिवसेनेला बळकट केले होते. त्यानंतर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होती. आता ती नाही. हा इतिहास पाहता मराठा मतदार शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाच्या विषयावरून भाजपाला धोबीपछाड देऊ शकतो. अशा वेळी मोदींच्या ‘करिश्मा’बरोबर विकासाचे कार्ड आणि भविष्यातील सर्वांगीण विकासाचे घोडदौड दाखविण्याच्या तयारीत भाजपा आहे. त्यामुळेच राज्यात आणि केंद्रातील डबल इंजिनचे ढोल वाजविले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात 2011 नंतर जनगणना झाली नाही. ती दहा वर्षांनंतर 2021 मध्ये करण्याची गरज होती. 2021 मध्ये कोरोनाचा कहर होता. पण, त्यानंतर दोन वर्षे झाली. पण, अद्यापपर्यंत देशाची जनगणना करण्याकडे नरेंद्र मोदी सरकारने दुर्लक्ष केले. ही जनगणना होताना जातीनिहाय व्हावी, अशी सर्वांची मागणी आहे. जनगणनेत निश्चितपणे जातनिहाय लोकांची संख्या समोर येईल. मग आरक्षणाच्या मागण्याचा पूर देशात व राज्यात निर्माण होईल. हे सर्व आतापर्यंत टाळले गेले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक, आर्थिक व सामान्य जनतेच्या इतर सर्व मागण्यांकडे जास्तच सहानुभूतीपूर्वक पाहतात. त्यात मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय राज्यात सुरू आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणास नकार दिला. मराठा आरक्षण हा लोकसभा निवडणुकीतदेखील कळीचा मुद्दा असेल. त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनी भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांना दणका दिल्याची आठवण या दोन्ही राजकीय पक्षांना आहे.

Maratha Reservation & Narendra Modi
Dhule Lok Sabha Constituency : डॉ.सुभाष भामरेंच्या मार्गात वय, पक्षांतर्गत स्पर्धकांचा अडसर...!

अशावेळी हा धोका टाळण्यासाठी भाजपा सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. मराठा आरक्षण हा विषय ज्वलंत ठेवण्यात जरांगे-पाटील यांना मोठे यश आले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक म्हणून मराठ्यांना (SEBC) शिक्षणात 12 टक्के आणि नोकरी 13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, तो सर्वोच्च न्यायालयाने मराठा मागास कसे, या विषयावरून फेटाळला. असे असताना शिंदे-फडणवीस-पवार हे सरकार विविध कमिशन स्थापन करीत, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वचन देत आहेत.

इतके करूनही मराठा समाज खुश झाला नाही तर काय, असा प्रश्न भाजपाश्रेष्ठींच्या मनात कायम घोळत आहे. राज्यातून कुठल्याही परिस्थितीत 45 लोकसभेच्या जागा शिंदे-फडणवीस-पवार या तिघांच्या युतीला पाहिजे. त्यासाठी राज्यातील कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरू झाले आहे.

Maratha Reservation & Narendra Modi
Modi Sarkar : ‘मोदी सरकार’ की ‘भारत सरकार’.. अरे भाई कहना क्या चाहते हो...?

राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदींचा आजचा सोलापूरचा सातवा-आठवा दौरा आहे. नुकताच नाशिक, पंचवटी, मुंबई असा मोदींचा दौरा झाला. त्यात अटल सेतूचे लोकार्पण झाले. आज सोलापूर अमृत योजनेतील गृहनिर्माण प्रकल्पात हजारो लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहे. यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्प, नगरच्या निळवंडे धरण, शिर्डीत साईदर्शन घेत मोदींनी महाराष्ट्रातील दौरे गेल्या काळात वाढविले. त्याचबरोबर विकासकामांचे लोकार्पण केले.

मोदींच्या ‘जादूई करिश्मा’चा फायदा घेत भाजपाला लोकसभा 2024 मध्ये यशस्वी व्हायचे आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत देशात मोदींच्या विविध क्लस्टरमध्ये 140 जाहीर सभा, रोड शो होणार आहे. हे करीत असताना भाजपा आता स्वपक्षीय नेत्यांना गावांकडे चला असा नारा देत मतदारांसोबत ‘कनेक्ट’ करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत मोदींचे महाराष्ट्रात अजून किती दौरे होतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Maratha Reservation & Narendra Modi
Daos Tour : मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा; कोट्यवधींची ‘ट्रिप’, लाखोंसाठी ‘होप’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com