Narendra Modi Solapur Tour  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Siddheshwar Yatra : मोदी सिद्धरामेश्वरच्या यात्रेला येणार का? चंद्रकांतदादांनी सांगितली अडचण...

Vijaykumar Dudhale

Solapur News : रे नगरमधील घरकुलांचे उद्‌घाटन आणि लाभार्थींना चाव्यांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वराच्या दर्शनाचेही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मोदी हे सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी येणार का, अशी चर्चा रंगलेली असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मोदींच्या दर्शनासाठी न येण्यामागची अडचण सांगितली. (Narendra Modi Will visit on Siddharameshwar yatra? Chandrakant Patil gave this answer)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्या सिद्धरामेश्वर यात्रेतील मोदी यांच्या येण्याबाबतची माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी, भाजप आमदार आणि नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सोलापुरातील सिद्धरामेश्वर यात्रेचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. त्यांची स्वतःचीही सिद्धेश्वर दर्शनाला येण्याची इच्छा आहे. पण, यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणं, हे सोयीचं आहे का?, याबाबत त्यांची सुरक्षण यंत्रणा विचार करेल. मोदींनी सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला आलं पाहिजे, असं मलाही वाटतं.

पंतप्रधान कार्यालयामध्ये मी त्याच्या सोलापूर दौऱ्याबाबत चौकशी करणार आहे. पण दुसऱ्या बाजूने भाविकांना मोठी अडचण होऊ शकते, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण, यात्रेला गर्दी प्रचंड असते आणि पंतप्रधानांची सुरक्षाही फार कडक असते, त्यामुळे भाविकांची गैरसोय होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सोलापूर येथील सिद्धरामेश्वराचे दर्शन घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप दिवसांपासून इच्छा आहे, त्यामुळे सिद्धरामेश्वराच्या यात्रेला येण्यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती करू; पण निर्णय त्यांच्या सुरक्षा समितीने करायचा आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारी रोजी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते लगेच दोन दिवसांनी होणाऱ्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेला येणार का, हा प्रश्न आहे. याशिवाय गड्डा यात्रेला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, तर पंतप्रधानांची सुरक्षाही अत्यंत कडक असते, त्यामुळे मोदी हे खरंच सोलापूरच्या यात्रेला येणार का, असा प्रश्न आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT