Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Solapur Guardian Minister : चंद्रकांतदादांचा सोलापूरकरांना शब्द; 'प्रत्येक आठवड्याला सोलापूरला येणार...'

Chandrakant Patil news : चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री सोलापूरला तीन तीन महिने येत नाहीत, या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
Published on

Solpaur News : यापुढच्या काळात मी प्रत्येक आठवड्याला सोलापूर येण्याचे कबूल केले आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूकरांना शब्द दिला. त्यामुळे पालकमंत्री सोलापूरला तीन तीन महिने येत नाहीत, या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. (I Will come to Solapur every week : Chandrakant Patil)

मागील पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तीन -तीन महिने सोलापूरकडे फिरकत नव्हते, त्यामुळे त्यांच्याबाबत सोलापूरध्ये नाराजी होती. विशेषतः भाजपचे पदाधिकारीही त्यांच्यावर नाराज होते. पण पक्षशिस्तीमुळे कोणी काहीही बोलत नव्हते. ती गोष्ट चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून गेली हेाती. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री म्हणून मी प्रत्येक आठवड्याला येणार आहे, असे सांगून टाकले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Solapur Politics : खेड्यावरून रंगलेल्या वादावर देशमुखांची नाराजी; 'माझ्या बोलण्याचा ‘ध’चा ‘मा’ केला जातो'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळात प्रत्येक आठवड्यात सोलापूरला येण्याचे कबूल केले. दर आठवड्याला सोलापूरला येण्याचे मी कबूल केले आहे. कारण, आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी मंजूर झाला पाहिजे, त्यासाठी काम करतो आहे.

नियोजन समितीतून भरीव निधी सोलापुरात होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलनासाठी देण्यात येईल. शासकीय निधीसोबत मी स्वतः अडीच लाख स्वतःच्या खिशातून दिले आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी माझी थेट भेट कधी झाली नाही. मात्र, सोलापूरच्या नाट्य संमेलनासाठी त्यांना आणण्याचा प्रयत्न करू. मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्याशी बोलून अमिताभ बच्चन यांना सोलापूरला आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Konkan politics : वैभव नाईकांच्या लढ्याला मोठे यश; विकास कामांवरील स्थगिती कोर्टाने उठवली

भाऊंची (कदम) एंट्री झाली की आपण लगेच हसायला लागतो, त्यांच्या सारखे व्यक्तीमत्व आपल्याला राजकीय आणि सामाजिक ताणातणावापासून मुक्त करत हसायला भाग पाडतं. ‘सेल्फी विथ माती’चा 1 लाख 13 हजार लोकांचा चीनचा उपक्रम होता. तो सेल्फी विथ मातीचा विश्वविक्रम आपण मोडला आहे. तसेच, पुण्यातील नॅशनल बुक ट्रस्ट संमेलनात 11 कोटी रुपयांची पुस्तकं विक्री झाली आहे, त्यामुळे सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाच रेकॉर्ड झालं पाहिजे, अशी अपेक्षाही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली.

Chandrakant Patil
Kolhapur Politics : मुश्रीफांच्या खंद्या समर्थकाला दणका; 'भूविकास'च्या थकबाकीमुळे युवराज पाटील 'आऊट'..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com