Mahesh Shinde, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP : राष्ट्रवादीला खोक्याचीच भाषा कळते; भांडवलदार, ठेकेदारांशीच त्यांचे संबंध... महेश शिंदे

जरंडेश्वर कारखान्‍याचे Jarandeshwar Sugar Factory प्रकरण ईडीच्या Ed माध्यमातून न्यायप्रविष्ट असून, शेतकरी हितासाठी कायदेशीर दाद मागण्याचे प्रयत्न सुरू असल्‍याचेही महेश शिंदे यांनी Mahesh shinde सांगितले.

Umesh Bambare-Patil

सातारा : जिल्ह्याचे प्रश्‍‍न प्रलंबित असून, महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भूमिपूजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला एक रुपया सुद्धा मिळाला नाही. गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, बडे भांडवलदार यांच्याशीच संबंध होते, असा घाणाघाती आरोप कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणीत शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे. कोरेगाव तालुक्यातील रस्‍त्‍यांसाठी ५० कोटींचा निधी त्‍यांनी दिला आहे.

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने जिल्ह्यासाठी काही केले नाही. खोट्या कामांतच त्‍यांनी वेळ खर्च केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपया दिलेला नाही.’’ पन्नास खोके एकदम ओके या विरोधकांच्‍या घोषणाबाजीवर आमदार शिंदे म्‍हणाले, की अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर बडे भांडवलदार यांच्याशी संबंध होते.

त्यामुळे ज्याला जसे दिसते तसे सुचते तशा घोषणा त्‍यांनी दिल्याचा टोला मारला. रयत शिक्षण संस्थेबाबत शिंदे म्हणाले, की ही संस्था पवार लिमिटेड कंपनी झाली असल्‍याची टीका केली. जरंडेश्वर कारखान्‍याचे प्रकरण ईडीच्या माध्यमातून न्यायप्रविष्ट असून, शेतकरी हितासाठी कायदेशीर दाद मागण्याचे प्रयत्न सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT