Navid Mushrif-Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election Result : हसन मुश्रीफांना मोठा धक्का : मुलगा नवीद मुश्रीफ मतमोजणीत पिछाडीवर; महायुती 12, तर समविचारी 8 जागांवर आघाडीवर

Hasan Mushrif News : गोकुळ निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे 12 तर समविचारी आघाडीचे आठ उमेदवार आघाडीवर आहेत. विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ पिछाडीवर असून शशिकांत खोत आघाडीवर असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 19 October : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महायुतीचे 12 तर समविचार आघाडीचे 08 उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे. मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव, गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ पिछाडीवर पडले आहेत, तर समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी आघाडी घेतली आहे.

गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे कल समोर येत असून सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीचे १४ उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर होते. तर माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे ६ जागा आघाडीवर आहेत.

सकाळाच्या सत्रातील निकालाचा कलात दुपारी मोठा उलटफेर झाला आहे. समविचार आघाडीने ८ जागांवर आघाडी घेतली असून महायुतीच्या दोन उमेदवारांना पिछाडीवर ढकललेल आहे. त्यामुळे महायुतीचे १२ उमेदवार आघाडीवर आहेत. त्या मुळे दोन्ही पॅनेलमध्ये आघाडी आणि उमेदवारांची संख्या अत्यल्प राहिलेली आहे.

दरम्यान, मतमोजणीत मंत्री हसन मुश्रीफ यांना जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव तथा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ हे मतमोजणीत पिछाडीवर पडले आहेत. त्यांना समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी धोबीपछाड देत आघाडी घेतली आहे.

राखीव गटातील महायुतीची केवळ 1, तर समविचारी आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक महायुतीतून, तर अंजना रेडेकर, बयाजी शेळके, माजी आमदार राजू आवळे समविचारीतून आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT