Gokul Election Result : 'गोकुळ'मध्ये सतेज पाटलांची धडधड वाढली! कोण आघाडीवर, उमेदवारांची यादी पाहा!

Gokul Election Mahayuti MVA : सतेज पाटलांच्या समविचार आघाडीचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत. तर, महायुती 15 जागांवर आघाडीवर आहे.
Gokul Election Result
Gokul Election Resultsarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News : गोकुळ निवडणुकीचे कल समोर येत आहेत. यामध्ये महायुतीचे तब्बल 14 जण किरकोळ मताधिक्याने आघाडीवर आहेत. तर, सतेज पाटलांच्या समविचार आघाडीचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये कोणाला किती मतं आहेत. त्याची यादी पुढील प्रमाणे.

1) पाटील राहुल पांडुरंग 980

2) नरके चेतन अरुण 979

3) मंडलिक विरेंद्र संजय 978

4) तायशेटे अभिजित प्रभाकर 962 (समविचारी आघाडी)

5) पाटील चंद्रकांत शशिकांत आनंद 948 (समविचारी आघाडी)

6) घाटगे अबरीशसिंह संजय 942

7) नरके आजिनाथ श्रीकांत 930

8) देसाई मदन बाबुराव 897

9) पाटील रणजितसिंह दिलीपराव 889

10) पाटील रणजितसिंह कृष्णराव 882

11) पाटील राजेश नरसिंगराव 883

12) चौगले किरण बाबुसो 861 (समविचारी आघाडी)

13) पाटील अजित पांडुरंग 850

14) पाटील युवराज दत्ताजीराव 843

15) पाटील सतीश भिमगोंडा 841

16) पाटील आर्यसिंह यशवंत 839

17) पाटील दीपक भरसू 836

18) गुरबे विद्याधर बाबुराव 836 (समविचारी आघाडी)

19) गायकवाड कर्णसिंह संजयसिंह 834

20) पाटील आबाजी उर्फ विश्वासराव 833

21) पाटील संभाजी रंगराव 820

22) डोमळे अरुण गणपतराव 818

23) चराटी अशोक काशिनाथ 815

24) देशाई राहुल बजरंग 812

25) चौगले बाबासाहेब श्रीपती 804

हा अंतिम निकाल नाही. दुसऱ्या फेरीत सतेज पाटलांची समविचार आघाडी पिछेहाटीवर दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gokul Election Result
Gokul Election : बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळच्या निवडणुकीत 'धार्मिक तांडव'; माजी आमदाराचे धक्कादायक विधान

गोकुळच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महायुती असे चित्र आहे. मागील वेळी ज्यांनासोबत घेऊन महाडिकांची सत्ता सतेज पाटलांनी घालवली ते मंत्री हसन मुश्रीफ यावेळी महायुतीसोबत आहेत. त्यामुळे महायुतीचे पारडे जड असल्याची चर्चा होती. मात्र, महायुतीला देखील क्राॅस व्होटिंगचा धोका वाटत असल्याने निकाल काय लागणार याविषयी त्यांना देखील चिंता आहे.

माजी संचालक पिछाडीवर

मतमोजणीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष हे अरुण डोंगळे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. मोठ्या मतांनी ते पिछाडीवर आहेत. तर,सतेज पाटलांच्या 'समविचारी'चे बाबासाहेब चौगले, किसन चौगले, शिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, राहुल देसाई हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

मतपेटीमध्ये चिठ्ठी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वी ठरावधारकांना आपल्या पॅनेलच्या उमेदवारांनाच मतदान करण्यासाठी शपथा घालण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले होते. दरम्यान, मतपेटीमध्ये काही चिठ्या सापडल्या असून त्यामध्ये एका चिठ्ठीत तुमच्या पोराबाळांसाठी आम्ही शपथा घ्यायच्या का? असे लिहिले आहे.

Gokul Election Result
Gokul Politics : 'गोकुळ'मधील घडामोडीची कुणकुण लागली, दौरे रद्द करत मुश्रीफ, कोरे, कदमांनी विशेष विमानाने मुंबई गाठली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com