Vitthal Chopade, Suhas Jambhale, and Balasaheb Deshmukh were appointed to key roles in Ichalkaranji by the NCP Ajit Pawar group, marking a strategic move ahead of the upcoming municipal elections. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : महापालिका निवडणुकीपूर्वी अजितदादांनी भाकरी फिरवली, नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

Ichalkaranji NCP Politics : मागील अनेक दिवसांपासून रखडलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीचा वाद अखेर मिटला आहे. पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी विठ्ठल चोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Rahul Gadkar

पंडित कोंडेकर

Ichalkaranji News, 18 Jul : मागील अनेक दिवसांपासून रखडलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीचा वाद अखेर मिटला आहे. पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी विठ्ठल चोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तर सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदी सुहास जांभळे यांची वर्णी लागली आहे. बाळासाहेब देखमुख यांची पक्षाच्या सेवा दल विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या तिघांच्या निवडीचे पत्र दिल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

राष्ट्रवादीच्या इचलकरंजीतील पदाधिकारी निवडीबाबत चुरस निर्माण झाली होती. विशेषतः इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चोपडे व जांभळे इच्छुक होते. त्यामुळे गुंता निर्माण झाला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थीतीत बैठका झाल्या होत्या.

मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नव्हता. अखेर पक्षाच्या वरील तिन्ही नेत्यांना पदाधिकारी निवडीचे अधिकार दिले होते. त्यामुळे नविन पदाधिकारी निवडीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर इचलकरंजीत संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठिशी राहिली होती.

कांही दिवसानंतर चोपडे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा व्यक्त करीत पक्षाचे स्वतंत्र कार्यालय सुरु केले होते. त्यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या रिक्त पदावर बाळासाहेब देशमुख यांची निवड अल्प काळासाठी केली होती.

तर अलीकडेच माजी आमदार अशोक जांभळे यांनी पुत्र सुहास यांच्यासह अजित पवार गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर नविन पदाधिकारी निवडी होत नसल्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षाच्या कार्यालयातील वर्दळही कमी झाली होती. येत्या सहा महिन्यावर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

त्यामुळे पदाधिकारी निवडी करणे आवश्यक बनले होते. गेल्या कांही दिवसांपासून याबाबतच्या प्रक्रीयेला वेग आला होता. पण चुरस वाढल्यामुळे मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिका-यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. अखेर आज याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी पदाधिकारी निवडीचा गुंता सुटला आहे.

पक्षाच्या नवनियुक्त पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढविण्यात येणार आहे. या तिघांचीही पक्षाला अत्यंत गरज आहे. त्यांनी ताकदीने काम करावे, यासाठी तिघांनाही नविन पदाधिकारी नियुक्तीवेळी सामावून घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT