Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan
Balasaheb Patil, Atul Bhosale, Udaysinh Undalkar, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad APMC News : कराडला कॉंग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी-भाजप युती; पाटील, चव्हाण आमनेसामने

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad APMC News : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपच्या युतीचे शेतकरी विकास पॅनेल विरूद्ध सत्ताधारी (कै.) लोकनेते विलासराव पाटील काका रयत पॅनेलने अशी दुरंगी लढत आहे. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan विरूद्ध राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil व भाजपचे नेते अतुल भोसले Atul Bhosale हे आमनेसामाने आहेत.

कराड बाजार समितीच्या १८ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी ३८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी रयत पॅनेलना हमाल-मापाडी गटातील एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. त्यामुळे १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी सध्या ३४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, आमदार बाळासाहेब पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

या वेळी कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, जयंत पाटील, माजी सभापती प्रणव ताटे, प्रशांत यादव आदी उपस्थित होते. शेतकरी विकास पॅनेलमधून सोसायटी गटातील सर्वसाधारण प्रवर्गातून जगदीश जगताप, मानसिंगराव जगदाळे, दयानंद पाटील, उद्धवराव फाळके, विनोद जाधव, दत्तात्रय साळुंखे, जयवंत मानकर.

तसेच महिला प्रवर्गातून मालन पिसाळ, रेखाताई पवार, इतर मागास प्रवर्गातून फिरोज इनामदार. विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून मारुती बुधे. ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गातून मानसिंग पाटील, प्रदीप शिंदे. अनुसूचित जाती- जमाती गटातून अंकुश हजारे. आर्थिक दुर्बल घटक गटातून आनंदराव मोहिते, तर व्यापारी अडते गटातून संतोष पाटील, राजेश शहा यांनी संधी देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सत्ताधारी (कै.) लोकनेते विलासराव पाटील काका रयत पॅनेलनेही त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सोसायटी गटातील सर्वसाधारण प्रवर्गातून विजयकुमार कदम, मोहन माने, अशोक पाटील, दीपक (प्रकाश) पाटील, शैलेश चव्हाण, प्रमोद कणसे, वामन साळुंखे, महिला प्रवर्गातून विजयमाला मोहिते, इंदिरा जाधव-पाटील.

इतर मागास प्रवर्गातून सर्जेराव गुरव, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून संभाजी काकडे, ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गातून संभाजी चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून शंकर इंगवले, अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून नितीन ढापरे, तर व्यापारी अडते गटातून जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी सामना होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT