-रविकांत बेलोशे
Makrand Patil News : वाईचे Wai आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत महाबळेश्वर Mahabaleshwar येथील गहू गेरवा संशोधन केंद्र याठिकाणी स्ट्रॉबेरी Strawberry संशोधन केंद्राला मंजुरी मिळाली आहे. या केंद्रासाठी तीन कोटी ४३ लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
महाबळेश्वर स्टॉबेरीला जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान असून तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.शासकीय पातळीवरून स्ट्रॉबेरीपासून विविध उपपदार्थांची निर्मिती करण्याबाबत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा यासाठी तालुक्यात संशोधन केंद्र असावे अशी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती.
या अनुषंगाने वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या गेली तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांना दिलासा मिळाला असून परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन जातींची रोपे व या रोपांवर संशोधन करुन लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.
आमदार मकरंद पाटील म्हणाले,आपल्याकडे स्ट्रॉबेरी फळांवर सखोल संशोधन झाले नाही. या संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीपासून उत्पादनातही मोठा फरक पडेल. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पन्न वाढेल तसेच जिल्ह्यातील अनुकूल भागातही स्ट्रॉबेरी पीक घेता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.