Bacchu Kadu Sarkaranma
पश्चिम महाराष्ट्र

Bacchu Kadu On Khate Vatap : आम्ही आता मंत्रिमंडळाच्या 'नेटवर्क'बाहेर; बच्चू कडूंनी सोडली आशा

Ajit Pawar And Bacchu Kadu : अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही आताच काही सांगता येणार नाही

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Khate Vatap And Bacchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शुक्रवारी (ता. १४) खातेवाटप करण्यात आले. यात शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या मंत्र्यांपेक्षा जास्त महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळाल्याची चर्चा आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थखाते देण्यात आले आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांसह अपक्ष आमदारांनीही आपल्या तलवारी म्यान केल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दाबाव टाकला आणि चांगली खाती पदरात पाडून घेतल्याचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, "खातेवाटपात वजनदार खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाल्याचे दिसून येत आहे. यासाठी अजित पवार यांनी व्यवस्थित दबाव टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राहिलेल्या लोकांच्या नशिबी काय आहे, हे समजत नाही. मागून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खातेवाटपात झुकते माप मिळालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसाठी अजित पवार यांनी त्यांच्या मर्जीनुसार खाती घेतली आहेत."

अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये यासाठी शिवसेना आमदारांची मागणी होती. यावर बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीत झालेल्या विसंगत निधी वाटपाचा दाखला दिला. कडू म्हणाले, "महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ९०-९० लाख रुपायंचा निधी दिली. तसा प्रकार आताही होऊ नये यासाठी शिंदे गटासह आमची मागणी होती की अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये."

कडू यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा होती. राष्ट्रवादीच्या येण्याने आणि खातेवाटपानंतर ती आता मावळली आहे. या पार्श्वभूमीवर आता आम्ही मंत्रिमंडळाच्या 'रेंज'मधून दूर गेलो आहोत, अशी मिश्किल टिपण्णीही कडू यांनी केली. बच्चू कडू म्हणाले, "खातेवाटपानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. आता येथे रेंजच नाही. या पाऊलवाटेवर मंत्रालयाचे 'नेटवर्क' येथे येत नाही. आम्ही मंत्रिमंडळाच्या 'नेटवर्क'च्याही बाहेर आहोत. त्यामुळे त्यांच्याशी आतापर्यंत काहीही बोलणे झालेले नाही."

यावेळी अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही याबाबत काही सांगता येणार नाही, असेही सांगितले. कडू म्हणाले, "एकंदरीत पाच वर्षतील राज्यात ज्या घडामोडी झाल्या त्या कधीही घडल्या नव्हत्या. गेल्या २० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मात्र इतक्या कमी कलावधीत एवढ्या घडामोडी झाल्याचे पाहिले नव्हते. त्यामुळे आताचे राजकारणात काही सांगता येत नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील नाही होणार याबाबत अंदाज लावणे कठीण झाले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT