Thackeray vs Shinde Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा पहिला झटका.. ; ठाकरे गटाच्या नेत्याची शिंदेंवर जहरी टीका

Maharashtra Politics : अर्थ खातं हे सर्वात महत्वाचं खातं असतं.
Thackeray vs Shinde Politics :
Thackeray vs Shinde Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare Criticized Shinde Group : पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाला शनिवारी खातेवाटप करण्यात आले, यात शिंदे गटाकडे असलेली काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली.पण अर्थ खात्यावरुन शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेली चढाओढही लपून राहिली नाही. अजित पवारांकडे अर्थखातं देऊ नये, असं शिवसेनेच्या आमदारांची मागणी होती. पण त्यांचा विरोध झुगारून अजित पवार यांनाच अर्थमंत्रीपद देण्यात आलं. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्लीवारीनंतर रखडलेलं खातेवाटप जाहीर झाले.

Thackeray vs Shinde Politics :
MLA Saroj Ahire : अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या कोण आहेत सरोज अहिरे?

अर्थ खातं जर अजित पवारांना द्यायचा नसेल तर अर्थखाते तुमच्याकडे घ्या अन् अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद द्या, अशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव पाहून मुख्यमंत्री शिंदे हे मागे फिरले, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्यानंतर सुषमा अंधारे यांनीदेखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

अब्दुल सत्तार यांचं खातं काढून घेतल्यामुळे मला वाईट वाटलं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा, असा सणसणीत टोलाही अंधारेंनी लगावला आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही शुभेच्छा दिल्या.

Thackeray vs Shinde Politics :
Ekath Shinde Nashik : मुख्यमंत्री शिंदेंनी उडवली विरोधकांची खिल्ली; मोदींवरोधात एकत्र येण्यापूर्वीच तुमची बोटच फुटली

अर्थ खातं हे सर्वात महत्वाचं खातं असतं. स्वतः मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करत असतात.प्रत्येक खाते वाटपावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिल्लीत जायचे, पण यावेळी मात्र दादा एकटेच गेले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता बाजूला झाले, त्यांचं केंद्रात असलेलं वजन कमी झालं आहे, आता त्यांना बाजूला सारले जात आहे, त्यामुळे आगामी काळात अजित पवार यांचाच अंतिम शब्द असणार, असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी नमुद केलं.

तिकडे गेलेल्या आमच्या 40 चुकार भावंडांनी अजित दादांना कंटाळून तिकडे जात असल्याचं कारण सांगितलं होतं. पण आता तेच दादा त्यांच्याच खात्याच्या पदावर आहेत, या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे की काय? असा सवाल ही सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com