Manohar sapate
Manohar sapate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सपाटेप्रकरणी राष्ट्रवादीने बोलावली बैठक; अंतर्गत वादावरही अजितदादा घेणार झाडाझडती

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर (Soapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत वाद आणि माजी महापौर मनाहेर सपाटे (Manohar Sapate) प्रकरणावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत तातडीने बोलविण्यात आली आहे. या बैठकीत अजितदादा हे अंतर्गत वादावरही पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे समजते. त्यामुळे बैठकीत काय तोडगा निघतो आणि सपाटे प्रकरणावर पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे. (NCP has called a meeting in Manohar Sapate case)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर शिवाजी महाविद्यालयातील एक शिक्षिकेने अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर सपाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची दखल घेऊन या प्रकरणाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागवून घेतला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठा संघटनांकडून सपाटे यांच्या अटकेची मागणी होत आहे. यात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा समावेश आहे. संबंधित महिला आणि सपाटे यांच्यातील वाद गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी हे प्रकरण वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातले आहे.

मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. अशा प्रकरणांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. या वेळी सपाटेंवर काय कारवाई होणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे. तसेच, पक्षातील अंतर्गत वादावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बलाढ्य दिसत असली तर अंतर्गत वादामुळे ती पोखरली गेली आहे. त्याची सुरुवातच मोहोळ तालुक्यातून होते. तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. उमेश पाटील यांच्याकडून अनगरच्या पाटलांवर चौफेर टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार, जयंत पाटील यांनी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर उमेश पाटलांना सूचना करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडून टीका होत आहे. त्यामुळे मोहोळमधील वाद मिटण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महिला नव्या पदाधिकारी निवडीवरून सोलापुरात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. जुन्या महिला अध्यक्षांकडून नव्या नेमुणकांवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT