उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवभोजन थाळी बंद होणार?

शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण या योजनेचा आढावा घेऊन ठरविणार आहेत.
Shiv Bhojan Thali
Shiv Bhojan Thali Sarkarnama

मुंबई : शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी (ShivBhojan Thali) सुरू ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) या योजनेचा आढावा घेऊन ठरविणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Uddhav Thackeray's dream project Shiv Bhojan Thali will be closed?)

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याचे वचन दिले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेत होते. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून केवळ १० रुपयांत जेवण मिळते. मात्र, शिंदेंनी बंड केले आणि भाजपच्या साथीने राज्यात सत्ता मिळवली. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यातच शिवभोजन थाळीचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद करायची की सुरू ठेवायची याचा निर्णय भाजपचे मंत्री चव्हाण घेणार आहेत.

Shiv Bhojan Thali
सत्तांतर झाल्यावर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटलीये: तानाजी सावंतांची जीभ घसरली

अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून शिवभोजन थाळी योजना चालविण्यात येते. त्यामुळे या योजनेचा आढाव या खात्याचे मंत्री या नात्याने रवींद्र चव्हाण आढावा घेणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण या आठवड्यात याचा आढावा घेणार आहेत, त्यानंतर शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय चव्हाण करणार आहेत.

Shiv Bhojan Thali
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं : पालघर जिल्हाप्रमुखानंतर उपजिल्हाप्रमुखांचाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

शिवभोजन थाळी योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. शिवभोजन थाळीची राज्यात खरोखरच गरज आहे का, हे पाहून याबाबतचा निर्णय कॅबिनेटसमोर ठेवल जाणार आहे. कॅबिनेटमध्ये याचा निर्णय होणार आहे.

Shiv Bhojan Thali
फडणवीसांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यातच मान्य केली अन्‌ नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली!

सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील महाविकास आघाडी सरकारने २ लाख प्लेट करण्यात याव्यात, असा प्रस्ताव दिलेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com