Beed Political News: "साहेब, आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचं काय चुकलं? आमच्यावर का हल्ले करताहेत. हे तुम्हाला शोभत नाहीत. तेलगी प्रकरणात माझे नाव नसतानाही माझा राजीनामा का घेतला?" असा सवाल उपस्थित करत अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केला. भुजबळांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"ज्यांचं खाल्लं, प्यायलं... त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत," अशी टीका आव्हाडांनी भुजबळांवर केली आहे. #Armstrong असा हँशटॅश त्यांनी वापरला आहे. "बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा," असे टि्वट करीत त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले आहे.
"शरद पवार साहेबांनी बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत छगन भुजबळ, दुसऱ्या बैठकीत धनजंय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्रीफ यांचा. इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत. आमच्याविरोधात मीटिंग झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असे शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे," असे छगन भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले होते छगन भुजबळ
शरद पवारांनी येवल्या येथील सभेत भुजबळांवर निशाणा साधला होता. त्यावर"आमच्या येथे साहेब म्हणाले की, मी माफी मागायला आलोय, चूक झाली. काय चूक झाली तर भुजबळांना उभं केलं. अरे भुजबळ चार वेळा निवडून आला. पवार माफी मागतो म्हणाले. माफी मागायची असेल तर गोंदियापासून कोल्हापूरपासून कुठे कुठे माफी मागणार? हा रस्ता दाखवला कोणी? साहेब हा रस्ता तुम्ही दाखवला, असे म्हणत भुजबळांनी पवारांना टोला लगावला.
2019 मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का?, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला, असे भुजबळ
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.