Swarajya First Anniversary : राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही बोलत नाहीत ; संभाजीराजे सत्ताधाऱ्यांवर संतापले

Chhatrapati Sambhaji Maharaj news : धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा होत आहे. पण ते शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडविणार?
Chhatrapati Sambhaji Maharaj news
Chhatrapati Sambhaji Maharaj news Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील दुष्काळाबाबत कोणीही बोलत नाही. राजकीय लोक आपल्याशी खेळ करीत आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा होत आहे. पण ते शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडविणार? असा प्रश्न 'स्वराज्य'प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला. स्वराज्य पक्षाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

"मी राजवाडा सोडून बाहेर आलो, ती माझी जबाबदारी आहे. मी शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न मी समजू शकलो. पंधरा वर्षात मला खूप अनुभव आला. राजा आपल्या दारी येत आहे,म्हणून जनतेने माझे स्वागत केले. हे प्रेम मी कधीही विसरु शकणार नाही. सामान्य जनतेने संघटीत व्हावे, म्हणून स्वराज्य संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या माध्यमांतून महाराष्ट्रातून पिंजून काढला. माझ्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा असल्याचे लक्षात आले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना भेटलो, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला," असे संभाजीराजे म्हणाले.

Chhatrapati Sambhaji Maharaj news
Narendra Modi News : महागाईच्या मुद्यांवरून विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती ; येत्या काही दिवसात आरोपांना ..

"ग्रामीण भागासह आता नाशिक, पुणे, मुंबईतही स्वराज्यची ताकद वाढत आहे. 'स्वराज'च्या शाखा वाढत आहेत. सध्या ७४० पेक्षा जास्त शाखा आहेत. गावगाड्यात जाऊन शाखाप्रमुखांच्या पाठीवर संभाजी महाराजांनी थाप दिली आहे. सध्या राजकारणात वारसा घेऊन आलेल्यांवर भष्ट्राचाराचे आरोप आहेत, पण आपला वारसा शाहू महाराजांचा आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा शाहू महाराजांचा वारसा आपण चालवित आहोत," असे 'स्वराज्य'चे सरचिटणीस डाँ. धनंजय जाधव यांनी सांगितले.

'स्वराज्य'च्या मुंबई कार्यकारणीकडून संभाजीराजेंचा सत्कार करण्यात आला. विनोद साबळे यांनी प्रास्ताविक केले. 'स्वराज्य'च्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com