Arun Lad News, Sangli Latest Marathi News
Arun Lad News, Sangli Latest Marathi News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदम, देशमुख यांना त्यांच्या धोरणाने चालू द्या..पण आम्ही आमचं ठरवलयं!

सरकारनामा ब्युरो

सांगली : "भविष्यात विधानसभेला काय करायचे, हे वरिष्ठ नेते ठरवतील, तो माझा अधिकार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत मात्र पलूस आणि कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच दाखवली जाईल," असे आमदार अरूण लाड (Arun Lad) यांनी बुधवारी सांगितले. इरिगेशन फेडरेशनच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली. (Sangli Latest Marathi News)

"राज्यमंत्री विश्‍वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि भाजपचे नेते संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांना त्यांच्या धोरणाने चालू द्या.आम्हाला आता कुणाची ताकद बनायचे नाही, कुणासोबत जायचे नाही.आम्ही पलूस आणि कडेगाव तालुक्यांत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे ठरवले आहे.आधी ताकद वाढवू आणि मग काय करायचे ते ठरवू," अशी भूमिका आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केली.

लाड म्हणाले, ‘‘कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांसह देशमुख भाजपमध्ये गेले.पक्ष रिकामा झाला. तेथे काँग्रेसने आम्हाला सामावून घेतले नाही. आम्ही वेगळा विचार केला, लढलो आणि आमचे अस्तित्व दाखवून दिले. पक्षाची आता तळातून बांधणी करावी लागणार आहे. त्याची सुरवात आम्ही केली आहे. आता आम्हाला कुणासोबत तरी जावून त्यांच्या गटात आमचा पासंग टाकायचा नाही.आम्हाला पक्षाची म्हणून ताकद वाढवायची आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीत तशाच सूचना दिल्या आहेत.’’इंधनदरवाढ : मोदी-ठाकरे आमनेसामने ; आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक

लाड म्हणाले, ‘‘भविष्यात विधानसभेला काय करायचे, हे वरिष्ठ नेते ठरवतील, तो माझा अधिकार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत मात्र पलूस आणि कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच दाखवली जाईल. त्यासाठी आमची तयारी सुरु झाली आहे. कदम, देशमुख यांना काय करायचे, त्यांनी करावे. आम्ही आमचा पक्ष वाढवत राहू.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT