Madan Bhosale, Makrand Patil
Madan Bhosale, Makrand Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

किसन वीर कारखाना : मदन भोसलेंना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांचे कडवे आव्हान!

सरकारनामा ब्यूरो

वाई : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत २१ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यावेळी विद्यमान अध्यक्ष व भाजपचे (BJP) नेते मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेल आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव पॅनेल यांच्यामध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. आपले सर्व पक्षीय पॅनेल असल्याचा दावा दोन्ही पॅनेलच्या नेतृत्वानी केला आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या ३ मे रोजी होत आहे. त्यासाठी २१ जागांसाठी ३४९ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर छाननीत २४३ अर्ज वैध ठरले. त्यापैकी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९७ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली.यामुळे ४६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. उद्या चिन्ह वाटप होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. भुईंज व सातारा गटात एक तर कोरेगाव गटात दोन जादा उमेदवार राहिले आहेत.

सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार निश्चित करताना आज आमदार महेश शिंदे उपस्थित होते. निवडणूकीच्या रिंगणात विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्यासह सी.व्ही.काळे, प्रविण जगताप, प्रताप यादव, रतनसिंह शिंदे, चंद्रसेन शिंदे, सचिन साळुंखे, विजया साबळे, आशा फाळके, नवनाथ केंजळे हे दहा संचालक उतरले आहेत. तर विरोधी किसनवीर बचाव पॅनेलमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्यासह सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे. तालुका सुत गिरणीचे चेअरमन शशिंकात पिसाळ, दिलीप पिसाळ, बाबासाहेब कदम, शिवसेनेचे हणमंतराव चवरे आदींचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार असे दिसून येते. किसनवीर बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी आज अंगारकी चतुर्थीला महगणपतीचे दर्शन घेऊन व नारळ वाढवून निवडणूक प्रचाराचा प्रारंभ केला.

निवडणूक लढविणारे उमेदवार पुढीलप्रमाणे...

  • कवठे - खंडाळा गट क्र.१ (तीन जागा सहा उमेदवार).- प्रताप ज्ञानेश्वर यादव (गुळुंब), दत्तात्रय गणपतराव गाढवे (खंडाळा), नितीन लक्ष्मणराव जाधव- पाटील (बोपेगाव), प्रविण विनायक जगताप (केंजळ), रामदास संपतराव गाढवे (खंडाळा),किरण राजाराम काळोखे (खानापूर)

  • भुईंज गट क्र २ (तीन जागा सात उमेदवार) - जयवंत सुर्यकांत पवार (चिंधवली), रामदास महादेव इथापे (देगांव), दिलीप भीमराव शिंदे (गंगापुरी वाई), प्रकाश लक्ष्मण धुरगुडे (भिरडाचीवाडी), मदन प्रतापराव भोसले (भुईंज), मानसिंग नारायण शिंगटे (मर्ढे), प्रमोद भानुदास शिंदे (जांब).

  • वाई - बावधन - जावली गट क्र ३ (तीन जागा सहा उमेदवार) - चंद्रसेन सुरेशराव शिंदे ( कुडाळ), शशिकांत मदनराव पिसाळ (बावधन), दिलीप आनंदराव पिसाळ (बावधन), हिंदुराव आनंदराव तरडे (बामणोली तर्फ कुडाळ ता.जावळी), विश्वास रामराव पा़डळे (रविवार पेठ वाई), सचिन आप्पासाहेब भोसले (बावधन)

  • सातारा गट क्र.४ (तीन जागा सात उमेदवार)- चंद्रकांत बजरंग इंगवले (किडगाव), भुजंगराव जिजाबा जाधव (गोवे),संदीप प्रल्हाद चव्हाण ( करंजे तर्फ सातारा), अनिल पांडुरंग वाघमळे, (आरळे), बाबासाहेब शिवाजी कदम (आरळे), सचिन हंबीरराव जाधव (गोवे), नवनाथ रघुनाथ साबळे (वडूथ).

  • कोरेगाव गट क्र ५ (तीन जागा आठ उमेदवार) - सचिन घनश्याम साळुखे (अंबवडे सं कोरेगाव), शिवाजी रामदास पवार ( बिचुकले), मेघराज सुरेश भोईटे (वाघोली), नवनाथ निवृत्ती केंजळे (कठापूर), संजय अरविंद फाळके (पाडळी), ललित जोतीराम मुळीक (अनपटवाडी), दिलीप उध्दव जाधव (जळगाव), रमेश दगडू माने (भोसे ता.कोरेगाव)

उत्पादक, बिगर उत्पादक व पणन संस्था मतदार संघ : मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील (बोपेगांव) रतनसिंह सर्जेराव शिंदे (परखंदी).

महिला राखीव प्रतिनिधी ( दोन जागा चार उमेदवार) - विजया जयवंत साबळे ( शिवथर), आशा दत्तात्रय फाळके ( सातारा रोड), श्रीमती सुशीला भगवानराव जाधव (जळगाव ता. कोरेगांव), सरला श्रीकांत वीर (कवठे ता.वाई).

अनुसुचित जाती- जमाती राखीवः- संजय निवृत्ती कांबळ (खडकी ता.वाई), सुभाष तात्याबा खुडे ( भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी (एक जागा दोन उमेदवार)- हणमंत बाबासाहेब चवरे (गोवे-खंडोबाचीवाडी ता. सातारा), चंद्रकांत वामनराव काळे (ओझर्डे), इतर मागास प्रवर्ग राखीव प्रतिनिधी ( एक जागा दोन उमेदवार ) - आनंदा कोंडीबा जमदाडे (शहाबाग), शिवाजी बंडु जमदाडे (शहाबाग).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT