मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी (२१ एप्रिल) सुनावणी होणार आहे. आवश्यक कागदपत्रे न उपलब्ध झाल्याने आजची सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ४) महेश जाधव यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान सरकारच्या वतीने फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. शिवाजीराव राणे न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत.
तर या प्रकरणातील बाकी आरोपींना अजित मगरे आणि संदीप गोडबोले यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आता या प्रकरणात दररोज नवनव्या घडामोडी समोर येत आहेत. उद्या गिरगाव कोर्टात सदावर्तेंना हजर करण्यात येणार असून त्यांच्या कोठडी संदर्भात उद्या कोर्ट निर्णय देणार आहे. मात्र त्यापूर्वीच सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई, कोल्हापूर, अकोला पोलिसांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुणरत्न सदावर्ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एकीकडे सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी गावदेवी पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून सदावर्तेंनी केरळमधून 23 लाखांची नवी कोरी गाडी विकत घेतल्याची माहिती काही मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी सदावर्तेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
तर दूसरीकडे, कोल्हापुर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एक पथक सदावर्ते यांना ताबा मिळवण्यासाठी मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मुंबई, कोल्हापूर पोलिसांच्या पाठोपाठ अकोला पोलिसही सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्ते यांचा ताबा घेण्याची अकोला पोलिसांना चौकशीसाठी सदावर्तेंचा ताबा मिळावा आणि त्यांना अकोट येथे नेण्याची परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी केला अर्ज अकोट प्रथमवर्ग न्यायालयात केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.