Rohit patil, Ajit Pawar And Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit patil : ठाकरे बंधूंचं ठरतानाच, पवार कुटुंबांमध्ये 'टाळी' वाजणार? रोहित पाटलांनीही घातली साद

NCP - NCP SP Alliance : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या युतीच्या चर्चांना बहर आला आहे. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी सहमती दर्शवल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशाही चर्चांना जोर धरू लागला आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : महाराष्ट्र हितासाठी, मराठीच्या मुद्द्यावर आपल्यासाठी भांडणे आणि मतभेद क्षुल्लक असून उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यास तयार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संकेत दिले. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी असे भाष्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. त्यांनीही यासाठी आपण सगळं सगळं विसरायला तयार असल्याचे सांगत होकार दिला. यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असे म्हटलं जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांनाच अप्रत्यक्ष साद घातली होती. त्यांनी फक्त ठाकरेच काय तर इतरांनीही एकत्र यायला हवं असे म्हटलं होते. यानंतर आता आमदार रोहित पाटील यांनी देखील अशीच साद घातली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आज (ता.21) जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित जलसंधारण बाबतच्या बैठकीसाठी तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील आले होते. आमदार रोहित पाटील हे आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र भागातील पाण्याच्या नियोजनासाठी हाताला सुई लावून ते बैठकीला हजर होते. यामुळे पुन्हा एकदा आबाची छबी रोहितमध्ये दिसत असल्याची चर्चा उपस्थितीत रंगली होती.

यावेळी राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र यावी असेही भावना व्यक्त केली जातेय. याबाबत आमदार रोहित पवार यांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करताना, फक्त ठाकरे बंधूच नाही तर इतर नेत्यांनीही एकत्र यायला हवं, असे म्हटलं होतं. तर त्यांचा हा रोख अजित पवार यांच्याकडे होता. आताही गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा अजित पवार-शरद पवार एकत्र आल्याने काका-पुतण्यात एकत्र येणार अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही शरद पवार-अजित पवार वेगळे नसल्याचे म्हणत चर्चेला रंग चढवला आहे. अशातच आता आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबुती निश्चित पणाने येईल, असाही विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT