Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar slams Ram Shinde : मंत्र्यांना केवळ फोन करून मंजुरी मिळत नाही ; रोहित पवारांचा शिंदेंना टोला

सरकरानामा ब्युरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : "मोदी@9" कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील मिरजगाव येथे व्यापारी मेळाव्यात व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना भर कार्यक्रमात फोन करून व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेस परवानगी बाबत मागणी केली, त्यावर कराडांनी सर्वेक्षण करून कार्यवाही करण्याची आणि बँकेच्या कार्यक्रमास येण्याचे कबूल केले होते. या बाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला होता.

यावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मतदारसंघातील बँकिंग सेवा सुधारण्यासाठी रोहित पवार यांचा कोरोना काळापासून केंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू असू लीड बँकेकडून सर्व्हेक्षण देखील पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यासाठी केलेल्या पाठपुराव्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्या सोबतच्या चर्चेचे फोटो, पत्र त्यांनी प्रसिद्ध माध्यमांना दिले आहेत.

यावर रोहित पवारांनी राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. "एखादी केंद्रीय पातळीवरील किंवा कोणतीही मंजुरी मिळवायची असेल तर त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे पाठपुरावा करणे आणि जी नियमानुसार प्रक्रिया आहे ती पूर्ण करणे हे गरजेचे असते. त्यामुळे उगाच कोणीतरी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना फोन करून मंजुरी मिळवली असे सांगत असेल तर त्यात कितपत तथ्य आहे हे लोकांनीच समजून घ्यावे," असे आमदार रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, "स्टेट लेव्हल बँकिंग कमिटी (SLBC) अंतर्गत या सुविधांसाठी मान्यता मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीच्या बैठकीसाठी DPDC ची मान्यता घेऊन प्रस्ताव पुढे देखील पाठवण्यात आला होता. तसेच लीड बँकेने याबाबत लागणारा सर्व्हे देखील यापूर्वीच पूर्ण केला आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ही आपण वैयक्तिक लक्ष घालून पूर्ण करून घेतली आहे,"

"फक्त बँकिंग नाही तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गोष्टी घडत नव्हत्या आता त्या घडायला लागल्याने विरोधक उगाच निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे आणि ते हे सर्व ओळखून आहेत असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT