Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje BhosaleSarkarnama

Udayanraje Vs Shivendraraje : दोन राजांच्या वादात आता राऊतांची एन्ट्री ; म्हणाले, "हा तर छत्रपतींच्या .."

Sanjay Raut News : साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आला आहे.
Published on

Karhad News : दोन दिवसापूर्वी साताऱ्यात (Satara News) शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेवर भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने सामने आले होते. (mp sanjay raut on Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosale)

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला. त्यानंतर उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी भूमीपूजन केलं. या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Waterlogging at Mumbai : मुंबईची झाली तुंबई ; मुख्यमंत्र्यांवर गायकवाड बरसल्या ; याला जबाबदार कोण ? उत्तर द्या..

या दोन राजांच्या वादावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत रविवारी कराड व पाटणच्या दौऱ्यावर आहेत.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

"साताऱ्याच्या दोन्ही राजांनी रस्त्यावर वाद घालणे चुकीचे आहे. हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे," असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत रविवारी कराड व पाटणच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री उशिरा त्यांचे कराडला आगमन झाले. रविवारी सकाळी त्यांनी पाटणला जाण्यापूर्वी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधा.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये अनेकांचे भवितव्य टांगणीवर ; खांदेपालट होण्यापूर्वी सचिवांकडून अहवाल मागवला..

यावेळी त्यांना साताऱ्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बाजार समितीच्या जागेवरून झालेल्या वादाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या दोघतील वाद म्हणजे गादीचा अपमान असल्याचे म्हटलं आहे.

"कोणीही राजेंवर टिका केली. तर तो छत्रपती शिवरायांच्या गादीचा अपमान ठरतो. मात्र तुम्ही दोन्ही राजे रस्त्यावर उतरून वाद घालणार किंवा भांडणे करणार असाल तर तो गादीचाच अपमान आहे," असे राऊत म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com