Maharashtra NCP Crisis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis : निर्णय अजितदादांचा..,कोंडी निष्ठावंतांची ; शशिकांत शिंदे म्हणाले, 'सलोख्याचे संबंध तुटले..'

सरकारनामा ब्यूरो

Satara News : राज्यातील राजकीय भूकंपावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या घडोमोडींवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 'अजित पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे,'असे शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले, "सध्या देशात आणि राज्यात राजकारण अतिशय दूषित झालेले आहे. राजकारणाची पातळी घटली आहे. लोकशाहीचे मूल्यांकन शोधणं गरजेचं झालं आहे. येणाऱ्या भविष्यकाळात लोकांनी राजकारणात पाऊल टाकावे की नाही ? असा प्रश्न पडलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष उभा करत असताना शरद पवार साहेबांबरोबर सर्वच नेत्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. सूडबुद्धीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उखडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे,"

"दादांवर ही तेवढेच प्रेम करणारे आम्ही सर्व मंडळी आहोत.पक्षामध्ये पवार साहेबांबरोबरच अजितदादांवर तितकंच आम्ही कार्यकर्त्यांनी प्रेम केलं. आज दुर्दैव आहे की घरातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्यासह अनेक लोकांच्या मनामध्ये दुःख आहे. शेवटी निर्णय अजितदादांचा होता. माझ्यासह अनेक लोकांची अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.," असे शिंदे म्हणाले.

कुटुंबामध्ये असलेला जेव्हा गट फुटतो तेव्हा कोणाच्या बाजूने गेले पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. या युद्धामध्ये कार्यकर्त्यांची आणि निष्ठावंतांची मोठी कोंडी होते. ज्यांनी हे सर्व घडून आणले त्यांचा स्वार्थ साधला गेला," असे शिंदे म्हणाले.

"इतक्या वर्षाचे सलोख्याचे संबंध या सर्वांमुळे तुटले जातात. परंतु तरीसुद्धा मानसिकतेचा आणि भविष्याचा विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. शेवटी निर्णय हा घ्यावाच लागतोआणि त्या पद्धतीने लवकरच निर्णय घेऊ," असे शिंदे यांनी नमूद केलं.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT